Myra Vaikul : परीचे संक्रांत स्पेशल फोटोशूट बघितले का ! घरातील चिमुकलीसाठी करु शकता असा लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:23 PM2023-01-09T13:23:24+5:302023-01-09T13:26:46+5:30

माझी तुझी रेशीमगाठ फेम 'मायरा'चे संक्रांत स्पेशल फोटोशूट

संक्रांतीचा सण जवळ आला की घराघरात लगबग असते. काळ्या रंगाचे कपडे, हलव्याचे दागिने बनवण्याची गडबड असते. तुमच्याही घरातील लहान मुलींना संक्रांतीला कसं तयार करायचे असा प्रश्न पडला असेल तर मायरा वायकुळ चा संक्रांत स्पेशल लुक बघा

क्युट परी म्हणजेच मायरा वायकुळचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचं गोड हसणं, डान्स करणं, छान छान पोझ देणं हे सर्व चाहते बघतच राहतात. आता देखील मायराचं एक फोटोशूट तुफान व्हायरल होतंय.

लहान मुली म्हणलं की परकर पोलकं हमखास घातले जाते. परकर पोलकं म्हणजे लहानपणीची गोड आठवणच असते. लहान मुली यात खूप सुंदर दिसतात. आपल्यापैकी जवळपास सगळ्याच मुलींनी परकर पोलकं घातलं असणार.

मायरानेही संक्रांतीसाठी खास काळ्या रंगाच्या परकर पोलक्यात फोटोशूट केले आहे. नेहमीप्रमाणेच मायरा यात गोड दिसत आहे. परकर पोलकं आणि छोटी पोनी असा तिचा साधा सरळ लुक आहे.

काळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज तिने घातला आहे. यावर पतंगांचे चित्र सुद्धा आहे. पैठणी स्टाईल हा ब्लाऊज आहे. तशीच एक छान लेस ब्लाऊजला लावली आहे. तर काळ्या रंगाचा परकर तिने घातला आहे.

परकर पोलक्यावर साजेसे दागिने तिने घातले आहेत. संक्रांत स्पेशल खास हलव्याचे दागिने बनवण्यात आले आहेत. दोन्ही हातात हलव्याच्या बांगड्या, हलव्याचेच गळ्यातले आणि कानात ठुशी.

मायराच्या फोटोंची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. न घाबरता गोड हसत ती कॅमेऱ्यासमोर येते. तिची आई श्वेता वायकुळ यांच्यासोबत नेहमी मायरा ट्विनिंग कपडे घालते. त्यांचे फोटोही खूप व्हायरल होतात.

मायरा सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काम करत आहे. तसंच तिने एक गाण्याचा अल्बमही केला आहे. याशिवाय मायराचे युट्युबवरील ब्लॉग कायम चाहत्यांना आवडत असतात.