कोण होतीस तू, काय झालीस तू! 'टाईमपास'मधली प्राजू दिवसेंदिवस होत चाललीय खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 07:00 AM2023-08-11T07:00:00+5:302023-08-11T07:00:00+5:30

Ketaki Mategaonkar : 'टाईमपास' चित्रपट रिलीज होऊन ९ वर्षांचा काळ उलटला असून केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे. तिच्यात झालेला बदल खूपच थक्क करणारा आहे.

२०१४ साली टाईमपास चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने साकारली होती. तर दगडूची भूमिका प्रथमेश परबने केली आहे.

टाईमपास चित्रपट रिलीज होऊन ९ वर्षांचा काळ उलटला असून केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे. तिच्यात झालेला बदल खूपच थक्क करणारा आहे.

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चेत येते.

दरम्यान आता केतकी माटेगावकरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो आहेत. पण या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

केतकी माटेगावकरचे हे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

केतकीच्या सोशल मीडियावरील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोशूटमध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर लक्षात येत तिच्यात किती बदल झाला आहे.

टाईमपासमधील सोज्वळ प्राजू आत भलतीच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांना खूप भावते आहे.

सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.

टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.याशिवाय तिने अनेक मालिकांसाठी पार्श्वगायनदेखील केलं आहे. काही सिनेमांसाठीही तिने तिचा आवाज दिला आहे.

केतकी आज कलाविश्वात प्रसिद्ध असून तिचे आई आणि वडीलदेखील संगीतविश्वाशी जोडलेले आहेत. तिची आई उत्तम गायिका आहे. तर, वडील हर्मोनियम वादक आहेत.