इतकी बदलली 'टाईमपास'मधली सोज्वळ प्राजू, केतकी माटेगावकरच्या अदांवरुन हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 07:00 AM2023-04-07T07:00:00+5:302023-04-07T07:00:00+5:30

Ketaki Mategaonkar : ९ वर्षांत प्राजू म्हणजेच केतकी माटेगावकरमध्ये खूपच मोठा बदल झालेला पाहायला मिळतो आहे.

२०१४ साली रिलीज झालेल्या टाईमपास चित्रपटातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने साकारली होती.

९ वर्षांत प्राजू म्हणजेच केतकी माटेगावकरमध्ये खूपच मोठा बदल झालेला पाहायला मिळतो आहे.

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

केतकीने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे.

केतकी माटेगावकरच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर लक्षात येत तिच्यात किती बदल झाला आहे.

टाईमपासमधील सोज्वळ प्राजू आत भलतीच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे.

केतकी माटेगावकरचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे केतकीचाही बोलबाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

विविध फोटोशूटमधून केतकी आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ करत असते.

केतकी माटेगावकर 'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात झळकली आहे.

अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे.