सुमित राघवनची बहीण आहे कपूर कुटुंबाची सून, मराठी सिनेमातही केलंय काम; ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 13:38 IST2026-05-17T13:17:59+5:302026-05-17T13:38:53+5:30
अभिनेत्रीचा जन्म मराठी कुटुंबातच झाला असून ती कपूर कुटुंबाची सून झाली, कोण आहे ही?

अभिनेता सुमित राघवन गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. मराठी सिनेमे आणि हिंदी मालिका त्याने गाजवल्या आहेत.

'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेमुळे सुमित हिंदीतलाही लोकप्रिय चेहरा बनला. नंतर तो 'वागळे की दुनिया', 'बडी दूर से आये है' या मालिकांमध्ये दिसला.

पण तुम्हाला माहितीये का सुमित राघवनची एक बहीणही आहे जी अभिनेत्री आहे. तिने एका मुलाखतीत याबाबतीत खुलासा केला. कोण आहे ती?

'बडे अच्छे लगते है' फेम राम कपूरची बायको गौतमी कपूर ही सुमित राघवनची बहीण आहे. गौतमी कपूर म्हणजेच लग्नाआधीची ती गौतमी गाडगीळ. मराठी कुटुंबात तिचा जन्म झाला.

सुमित राघवनमुळेच खरं तर तिची अभिनयात एन्ट्री झाली. 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी कपूर म्हणालेली, "मी अगदीच योगायोगाने अभिनय क्षेत्रात आले. अभिनेता सुमित राघवन जो माझा भाऊ आहे. त्याला पोर्टफोलिओ बनवायचा होता म्हणून मी त्याच्यासोबत गेले होते."

"तर तिथे गौतमजींनी मला पाहून विचारलं की तू सुद्धा तुझे फोटो का काढत नाही? मी तेव्हा तेलकट केस आणि दोन पोनी अशा अवतारात होते. मी सरप्राईज होऊन विचारलं, मी फोटोशूट करु? माझ्या आईचीही तशीच प्रतिक्रिया होती."

"तेव्हा मी मेडिकलचं शिक्षण घेत होते. पोर्टफोलिओसाठी १० हजार रुपये लागणार होते. माझ्या आईने सांगितलं की आमच्याकडे फोटोशूटसाठी १० हजार नाहीत. त्याजागी आम्ही तिला पुस्तकं आणून देऊ. माझ्या वडिलांनीही नकार दिला."

माझे वडील, भाऊ, वहिनी सगळे डॉक्टर आहेत. आई शाळेत मुख्याध्यापिका होती. मी स्वत: पॅथॉलॉजिस्ट आहे. त्यामुळे अभ्यासाशिवाय आम्ही कोणीच काही केलं नव्हतं. फोटोशूट करुन मॉडेलिंग करणं दूरच होतं. पण मी २००० साली आई वडिलांना सांगितलं की मला वेगळं राहायचं आहे. घरात खूप तमाशा झाला. पण शेवटी त्यांनी माझं ऐकलं आणि मी एकटी राहायला सुरुवात केली.

मी पैसे कमवत होते. मला अभिनय करायचाच आहे असंही मी नंतर त्यांना समजावलं. वडीलांनी होकार दिला पण माझ्या आईने शेवटपर्यंत या गोष्टीला नकारच दिला होता."

मुलाखतीत गौतमीने सुमित नक्की कोणता भाऊ आहे हे स्पष्ट केलेलं नाही. गौतमीने त्याच्या 'हॅम्लेट' या नाटकाच्या प्रयोगालाही हजेरी लावली होती. हा त्याचवेळचा फोटो आहे. २००३ साली गौतमी राम कपूरसोबत लग्नबंधनात अडकली तिला सिया आणि अक्स ही मुलं आहेत.

















