'राजा शिवाजी' सिनेमाचं शूटिंग कुठे झालं माहितीये का? अगदी जवळच आहेत ही ठिकाणे; तुम्हीही देऊ शकता भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:10 IST2026-05-06T14:29:24+5:302026-05-06T15:10:52+5:30

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय राजा शिवाजी सिनेमाचं शूटिंग, तुम्हाला माहितीये का?

अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा ऐ़तिहासिक सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

हा चित्रपट रिलीज होऊन केवळ ५ दिवस झाले आहेत. अशातच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा यावर्षीचा मराठीतील सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.

'राजा शिवाजी' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा प्रवास मांडतो.रितेश देशमुख आणि टीम गेल्या १० वर्षांपासून सिनेमावर मेहनत घेत होती.

'राजा शिवाजी' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा प्रवास मांडतो.रितेश देशमुख आणि टीम गेल्या १० वर्षांपासून सिनेमावर मेहनत घेत होती.

या चित्रपटात रितेश देशमुखसह जेनेलिया देशमुख,सलमान खान, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, बमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी अशा तगड्या कलाकारांची फळी बघायला मिळते. शिवाय अनेक मराठी कलाकार यात झळकले असून विशेष म्हणजे रितेश देशमुखच्या मुलांनीही या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

एकीकडे मनोरंजनविश्वात 'राजा शिवाजी' सिनेमाची चर्चा असताना अनेकांना असा प्रश्न पडतोय की पडद्यावर दिसणाऱ्या या भव्य दिव्य चित्रपटाचं शूटिंग नेमकं कुठे झालं आहे? जाणून घ्या...

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. महाबळेश्वरसह सातारा जिल्हयातील अनेक ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे.महाबळेश्वर येथील कृष्णाबाई मंदिराच्या परिसरात या सिनेमाचं शूटिंग करण्यात आले आहे.

या चित्रपटातील काही सीन हे सातारा जिल्ह्यातील संगम माहुली परिसरातील तसेच वाई येथे शूट केले गेले आहेत. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले हे सह्याद्री पर्वत रांगेत काही ठिकाणी याचं चित्रीकरण केलं गेलं आहे.

तसेच मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीत तसेच फिल्मसिटी परिसरातील तलावाच्या ठिकाणी काही सीन शूट करण्यात आले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर भव्यतेने आणि भावनिकतेने उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारा ठरत आहे.