अंशुमन विचारेच्या लेकीला अनेकदा पाहिलंय ना? आता जाणून घ्या त्याच्या पत्नीविषयी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 12:47 PM2022-03-22T12:47:44+5:302022-03-22T12:52:21+5:30

Anshuman vichare wife: या व्हिडीओमध्ये अनेकदा अन्वीच्या आईचा म्हणजेच अंशुमनच्या पत्नीचा आवाज ऐकायला येतो. मात्र, ती फारशी कॅमेरात दिसत नाही.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. उत्तम अभिनयशैली आणि संवादफेक कौशल्य यामुळे अंशुमन आज लोकप्रिय झाला आहे.

'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक चित्रपटातून त्याने अभिनयासोबतच त्याच्यातील गायनाची कलादेखील प्रेक्षकांना दाखवून दिली.

'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक चित्रपटातून त्याने अभिनयासोबतच त्याच्यातील गायनाची कलादेखील प्रेक्षकांना दाखवून दिली.

कलाविश्वाप्रमाणेच अंशुमन सोशल मीडियावरही सक्रीय असतो. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या लेकीचे अन्वीचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो.

या व्हिडीओमध्ये अनेकदा अन्वीच्या आईचा म्हणजेच अंशुमनच्या पत्नीचा आवाज ऐकायला येतो. मात्र, ती फारशी कॅमेरात दिसत नाही. त्यामुळे अंशुमनच्या पत्नीला पाहण्यासाठी वा तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

अंशुमनच्या पत्नीचं नाव पल्लवी असं असून ती व्यवसायाने वकील आहे.

पल्लवी खऱ्या आयुष्यात प्रचंड साधी असल्याचं पाहायला मिळतं.

अंशुमनचा सोशल मीडियावर जरी चांगला वावर असला तरीदेखील पल्लवी फारशी सक्रीय नाही.

अंशुमन विचारेच्या फॅमिलीचा एक सुंदर फोटो