सयाजी शिंदेंच्या पत्नीला पाहिलंत का?, कलाविश्वात वावर नसला तरी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 07:00 AM2022-09-10T07:00:00+5:302022-09-10T07:00:00+5:30

Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकांना माहित नाही. त्यांची पत्नी आणि मुले लाईमलाईटपासून लांबच राहतात.

मराठी अभिनेता सयाजी शिंदे यांनी मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे सिनेसृष्टीत आपली जागा निर्माण केली आहे. तसेच, ते सामाजिक कार्यातही सहभागी होतात. त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकांना माहित नाही.

सयाजी शिंदे यांची पत्नी आणि मुले लाईमलाईट पासून लांबच राहतात. त्यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे आहे आणि त्या दिसायला खूप सुंदर आहे. आणि या दोघांना सिद्धार्थ हा मुलगा आहे.

नुकतेच अलका शिंदे यांनी सोशल मीडियावर अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असले तरी त्यांचे सोशल मीडियावर फोटो बघायला मिळतात. सयाजी शिंदे यांनी मराठी एकांकिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

तसेच, झुलवा या मराठी नाटकातील अभिनय लोकप्रिय झाला आहे. त्यानंतर त्यांनी इतर भाषेत देखील अभिनय केला आहे.

तसेच सयाजी शिंदे यांनी अबोली या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

याबरोबरच त्यांनी अनेक नाटकात काम केले आहे. ‘सखाराम बाईंडर’ या त्यांच्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक झालं आहे.

तसेच, झुलवा, वन रूम किचन, आमच्या या घरात त्यांची नाटके खूप गाजली आहेत. गोष्ट छोटी डोंगरा एवढी या सिनेमातील त्यांची कृषिमंत्री ही भूमिका खूप गाजली आहे.

तसेच, सयाजी शिंदे यांच्या साऊथच्या सिनेमातील अनेक भूमिका गाजल्या होत्या.