सयाजी शिंदे यांच्या मुलाला पाहिलंत का?; दिसायला आहे खूप हॅण्डसम, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 07:00 AM2022-10-29T07:00:00+5:302022-10-29T07:00:00+5:30

Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकांना माहित नाही. त्यांची पत्नी आणि मुलगा लाईमलाईटपासून लांबच राहतात.

अभिनेता सयाजी शिंदे यांनी मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकांना माहित नाही. त्यांची पत्नी आणि मुलगा लाईमलाईटपासून लांबच राहतात.

सयाजी शिंदे यांची पत्नी आणि मुलगा लाईमलाईट पासून दूर राहतात. त्यांच्या पत्नीचं नाव अलका शिंदे आहे आणि त्या दिसायला खूप सुंदर आहे.त्या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव सिद्धार्थ आहे.

सिद्धार्थदेखील दिसायला खूप हॅण्डसम आहे. वडील अभिनय क्षेत्रात जरी कार्यरत असले तरी तो लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करतो.

सिद्धार्थचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

बाप-लेकामध्ये खूप छान बॉण्डिंग आहे, हे त्यांच्या फोटोतून पाहायला मिळत आहे.

सयाजी शिंदे यांनी मराठी एकांकिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. झुलवा या मराठी नाटकातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर त्यांनी इतर भाषेत देखील अभिनय केला आहे.

तसेच सयाजी शिंदे यांनी अबोली या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. याबरोबरच त्यांनी अनेक नाटकात काम केले आहे. ‘सखाराम बाईंडर’ या त्यांच्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक झालं आहे.

तसेच, झुलवा, वन रूम किचन, आमच्या या घरात त्यांची नाटके खूप लोकप्रिय ठरली आहेत. गोष्ट छोटी डोंगरा एवढी या सिनेमातील त्यांची कृषिमंत्री ही भूमिका खूप गाजली आहे.

तसेच, सयाजी शिंदे यांच्या साऊथच्या चित्रपटातील अनेक भूमिका गाजल्या होत्या.