केतकी माटेगावकरच्या आईला पाहिलंत का?; फोटो शेअर करत म्हणाली - 'देवाची पूजा करुन...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:25 AM2022-10-29T11:25:36+5:302022-10-29T11:28:58+5:30

Ketaki Mategaonkar : अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर हिने शाळा, टाइमपास यासह विविध चित्रपटातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे.

अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर हिने शाळा, टाइमपास यासह विविध चित्रपटातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे.

या चित्रपटांतील भूमिकांमुळे एक सोज्वळ अभिनेत्री अशीच ओळख केतकी माटेगावकरच्या फॅन्सच्या मनात आहे.

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

दरम्यान, आता केतकी माटेगावकरने तिच्या आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. केतकी माटेगावकरने आईसोबत दिवाळी निमित्ताने फोटोशूट केले आहे.

तिने फोटो शेअर करत लिहिले की, देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही... आईची पुजा करुन देव मिळवता येतो. माझी गोड आई.

केतकी माटेगावकरच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर केतकी माटेगावकरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

केतकीने शाळा, टाईमपास, टाईमपास-२, काकस्पर्श, तानी अशा विविध चित्रपटांमधून अभिनय केला आहेत.