'बालक पालक'मधील डॉली आठवते का? आता दिसते कमालीची सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:00 AM2022-02-28T07:00:00+5:302022-02-28T07:00:00+5:30

Shashwati pimplikar: बालक-पालकनंतर तिने शेजारी शेजारी पक्के शेजारी आणि चाहूल या मालिकांमध्ये काम केलं.

मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांचा बालक पालक चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सई ताम्हणकर, प्रथमेश परब, मदन देवधर, रोहित फाळके, भाग्यश्री संकपाळ आणि शाश्वती पिंपळीकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

या चित्रपटातील बालकलाकार आता मोठे झाले असून ते सध्या काय करतात, कसे दिसतात असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. त्यामुळेच आज या चित्रटातील डॉलीविषयी जाणून घेऊयात.

या चित्रपटात डॉली ही भूमिका अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने साकारली होती.

चित्रपटातील डॉली अर्थात शाश्वती आता चांगली मोठी झाली असून प्रचंड सुंदर दिसते.

शाश्वती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

शाश्वतीचं लग्न झालं असून ती आता वैवाहिक जीवनात व्यस्त आहे.

शाश्वती मूळ पुण्याची असून तिने शालेय शिक्षण रोसरी हायस्कूल येथे केलं आहे. तर, महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलं आहे.

बालक-पालकनंतर तिने शेजारी शेजारी पक्के शेजारी आणि चाहूल या मालिकांमध्ये काम केलं.