अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीची गगनभरारी! अभिमानाने भरुन आला आईचा उर; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 04:55 PM2023-02-04T16:55:56+5:302023-02-04T17:04:19+5:30

Alka Kubal : अलका कुबल यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तिरेखा साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

अलका कुबल सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशा सक्रीय नसल्या तरी त्या सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात.

अलका कुबल आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत. एकीचं नाव ईशानी आहे तर दुसरीचं कस्तुरी.

ईशानी पायलट आहे तर धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात डर्मेटोलॉजिस्टचे शिक्षण घेत होती आणि नुकतीच ती डॉक्टर झाली आहे. ही माहिती खुद्द अभिनेत्रीनेच सोशल मीडियावर दिली आहे.

अलका कुबल यांनी इंस्टाग्रामवर कस्तुरीचा फोटो शेअर करत लिहिले की, कस्तुरी ने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली.

त्यांनी पुढे लिहिले की, आज पासून डॉ.कस्तुरी आठल्ये. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. खूप शुभेच्छा!

अलक कुबल यांच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

तसेच मराठी सेलिब्रेटीही कस्तुरीचं अभिनंदन करत आहेत.

अलका कुबल यांच्या दोन्ही मुलींनी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळे क्षेत्र करिअरसाठी निवडले आहे.

अलका कुबल शेवटच्या आई माझी काळूबाई या मालिकेत पाहायल्या मिळाल्या आहेत.

अलका कुबल एका मराठी चित्रपटात झळकणार आहेत. ज्याचे शूटिंग लंडनमध्ये पार पडले आहे.