रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 14:52 IST2025-12-22T14:40:11+5:302025-12-22T14:52:24+5:30
मराठी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत खास प्री वेडिंग अंदाजात फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं असून अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे

अलीकडच्या काळात अनेक मराठी अभिनेत्रींची लग्न झाली. अशातच आणखी एक मराठी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्रीचं नाव रसिका वाखारकर

रसिकाने होणाऱ्या नवऱ्यासोबत खास अंदाजात फोटोशूट केलं आहे. रसिकाचं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं असून चाहत्यांनी पसंती दिली आहे.

रसिका वाखारकरने या रोमँटिक फोटोंसोबत कॅप्शनमध्ये रस्सम टू माय राईस, अशी लिहिलं आहे. रसिका आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा हा साऊथ इंडियन अंदाज चाहत्यांना पसंत पडला आहे.

रसिका वाखारकर गुलाबी आणि पांढरी किनार असलेली साडी परिधान केली आहे. तर तिच्या नवऱ्याने पांढरा शर्ट, लुंगी आणि खांद्यावर उपरणं असा साउथ इंडियन अंदाज परिधान केला आहे.

रसिका वाखारकरला आपण तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. सध्या रसिका अशोक मा.मा. मालिकेत अभिनय करताना दिसतेय.

रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शुभांकर उंब्रानी असं आहे. रसिका आणि शुभंकर यांनी काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा केला.

रसिका आणि शुभंकर नवीन वर्षात अर्थात २०२६ मध्ये एकमेकांसोबत लग्न करण्याची शक्यता आहे. रसिकाने काहीच दिवसांपूर्वी अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या घरी केळवण केलं.

















