एक-दोन नव्हे तर तब्बल 28 चित्रपट केले रिजेक्ट; 'ही' चिमुकली आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:58 PM2024-03-13T13:58:14+5:302024-03-13T14:12:28+5:30

अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान मिळवलं आहे. ती प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावते.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या निमरत कौरचा जन्म 13 मार्च 1982 रोजी झाला. अभिनेत्री तिचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दिल्लीत राहणाऱ्या निमरतने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान मिळवलं आहे. ती प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावते. प्रत्येक चित्रपटात तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे.

चित्रपट निवडताना निमरत खूप विचारपूर्वक निर्णय घेते, त्यामुळे तिने 1,2 नाही तर 27-28 चित्रपट नाकारले आहेत. वाढदिवसानिमित्त निमरत कौरबद्दल जाणून घेऊया...

निमरतने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. कॉलेजच्या दिवसांपासून तिने दिल्लीच्या स्थानिक थिएटरमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.

शिक्षणानंतर ती मुंबईला गेली आणि तिथेही थिएटर करू लागली. यातूनच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी निमरतने अनेक अल्बम आणि जाहिरातींमध्ये काम केले होते.

वन नाईट विथ द किंग या इंग्रजी चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अनुराग कश्यपच्या पेडलर चित्रपटात काम मिळालं आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

निमरत नेहमीच चांगल्या चित्रपटांच्या शोधात असते. याच कारणामुळे तिने 27-28 चित्रपट नाकारले आहेत. द लंचबॉक्समुळे निमरतचे खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटात तिने इरफान खानसोबत काम केलं होतं.