एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या कलाकारांचा दुर्देवी अंत झाला होता बंद खोलीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 04:45 PM2023-07-15T16:45:14+5:302023-07-15T16:54:02+5:30

Ravindra Mahajani : अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

अभिनेते रवींद्र महाजनीच नाही, तर याआधीही काही कलाकारांचे अशारितीने मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेत्री श्रीदेवीचा २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत मृत्यू झाला होता. एका हॉटेलमधील खोलीतील बाथटबमध्ये पाण्यात डुबलेल्या अवस्थेत आढळली होती. सुरुवातीला अभिनेत्रीचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर दुबई पोलिसांच्या तपासानंतर कार्डियक अरेस्टने अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलले जाते. या मृत्यूप्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली, पण अद्याप सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

७०-८०च्या दशकातील परवीन बाबी यांचे २२ जानेवारी २००५ रोजी मृत्यू झाल्याचे समोर आले. दक्षिण मुंबईतील त्यांच्या राहत्या घरात त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. जवळपास २० जानेवारी त्यांचा मृत्यू झाल्याचं बोलले जाते. दोन दिवसांनी त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांच्या घराबाहेर अनेक दिवस दूधाच्या पिशव्या पडलेल्या होत्या. पोलिसांनी दरवाजा तोडला त्यावेळी त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलेला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.

२३ सप्टेंबर १९९६ रोजी सिल्क स्मिता यांचा त्याच्या चेन्नईतील अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळला. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचे म्हटले होते. काही रिपोर्ट्सनुसार, सिल्क स्मिता यांनी डिप्रेशन आणि आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. काहींनी त्यांची हत्या झाल्याचे म्हटले होते.

अभिनेत्री जिया खानचे जून २०२३ मध्ये निधन झाले. पोलिसांनी तपासात अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे सांगितले, पण अभिनेत्रीच्या कुटुंबाने तिची हत्या झाल्याचे आरोप केले होते. जिया खानचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.