इलियाना डिक्रूझच्या आधी 'या' बॉलिवूड अभिनेत्री झाल्या होत्या लग्नाआधीच प्रेग्नंट; नाव ऐकून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 03:03 PM2023-04-18T15:03:57+5:302023-04-18T15:14:47+5:30

Bollywood actress: बॉलिवूडमध्ये अशा काही लोकप्रिय अभिनेत्री आहेत ज्या लग्नापूर्वीच गरोदर होत्या.

'बर्फी' फेम अभिनेत्री इलियाना डीक्रुज अचानक चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

पहिला फोटो टीशर्टचा आहे ज्यावर 'अँड सो द अँडव्हेंचर बिगिन्स' असं लिहिलेलं आहे. तर दुसरा फोटो तिच्या गळ्यातील पेंडंटचा आहे. 'mama' (ममा) अशा आशयाचं हे पेंडंट आहे. इलियानाची पोस्ट बघून सगळ्यांना धक्काच बसला आहे. अनेक सेलिब्रिटी तिला शुभेच्छा देत आहेत. लग्नाआधी इलियाना गरोदर असल्यामुळे चर्चांचा उधाण आलं आहे. इलियाना आधीही बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधी किंवा लग्न न करता प्रेग्नेंट राहिल्या होत्या. (फोटो इन्स्टाग्राम)

सध्याच्या काळातील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर अभिनेत्री आलिया भटने गुड न्यूज देत लवकरच आई होणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर काही महिन्यातच आलियाने लेकीला जन्म दिला.(फोटो इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया खूप चर्चेत असते. रिपोर्ट्सनुसार, नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नेंट होती. त्यानंतर तिने घाई करत लग्न केलं, या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लग्नानंर काही महिन्यातच तिने मुलीला जन्म दिला. (फोटो इन्स्टाग्राम)

परदेस या चित्रपटातून खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. त्याकाळी महिमाच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या. महिमादेखील लग्नापूर्वी प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातं. २००६ मध्ये तिने गुपचूपपणे लग्न केलं आणि लग्नाच्या काही महिन्यातच तिच्या पहिल्या लेकीला जन्म दिला. (फोटो इन्स्टाग्राम)

रोकठोक बोलण्याची पद्धत आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मादेखील लग्नापूर्वी प्रेग्नंट होती. कोंकणाने १५ मार्च २०११ मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या सहा महिन्यांमध्येच तिने तिच्या मुलाला जन्म दिला. (फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेत्री सेलिना जेटलीदेखील लग्नापूर्वी प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातं. मात्र, सेलिनने हे वृत्त फेटाळून लावलं आहे.लग्नापूर्वी मी प्रेग्नंट नव्हते. या अफवा आहेत, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

क्रिकेटपटू विव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता 1980 मध्ये त्यांच्या अफेअरमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. नीना यांनी मसाबा गुप्ता 1989 साली जन्म दिला. विव रिचर्ड्सचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. नीना गुप्ता यांनी खूप वर्षांनी बिझनेसमन विवेक मेहरासोबत लग्न केले. (फोटो इन्स्टाग्राम)

लोकप्रिय अभिनेत्री सारिका हासनदेखील लग्नापूर्वीच गरोदर होत्या. त्यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्याशी लग्न केलं होतं. सारिका हासन लग्नापूर्वी गरोदर होत्या. त्यामुळे लग्नानंतर काही महिन्यातच त्यांनी अनुष्काला जन्म दिला. त्याकाळी त्यांची बरीच चर्चा रंगली होती.