Urmila Matondkar: ‘रंगिला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने शेअर केले स्टनिंग फोटो, पाहून तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:55 PM2022-03-09T22:55:52+5:302022-03-09T22:59:05+5:30

Urmila Matondkar Photos: 'हो जा रंगिला रे' म्हणत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने सिनेरसिकांना वेड लावले होते. मात्र सध्या उर्मिला मातोंडकर ही अभिनयापेक्षा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सक्रिय आहे.

'हो जा रंगिला रे' म्हणत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने सिनेरसिकांना वेड लावले होते. मात्र सध्या उर्मिला मातोंडकर ही अभिनयापेक्षा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सक्रिय आहे.

उर्मिला मातोंडकर ही अभिनयापासून दूर असली तरी तिच्या अभिनयाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. दरम्यान, उर्मिला मातोंडकर हिने तिच्या फेसबूक पेजवर शेअर केलेल्या फोटोंची आज चर्चा सुरू होती.

उर्मिला मातोंडकर हिने तिच्या फेसबूक पेजवर काही स्टनिंग फोटो शेअर केले आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

वेन्सडे वाव! अशी कमेंट्स करत उर्मिला मातोंडकर हिने हे फोटो शेअर केले आहेत.

उर्मिला मातोंडकर हिने बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड सिनेमामधून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.

उर्मिला मातोंडकरने मोहसिन अख्तर मीर या काश्मिरी तरुणासोबत विवाह केला आहे. तसेच तिने २०१९ मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर तिने शिवसेनेत प्रवेश केला होता.