भाईजान की तो निकल पडी...! सलमानला मिळाले लाखो-कोटींचे बर्थ डे गिफ्ट, कतरिनाने काय दिलं वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:24 PM2021-12-29T17:24:24+5:302021-12-29T17:41:44+5:30

Salman Khan B'day Gifts: सलमान खानने गेल्या 27 डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. आता बर्थ डेची चर्चा होणार तितकीच भाईजानच्या बर्थ डे गिफ्ट्सही चर्चा होणारच ना!

सलमान खानने गेल्या 27 डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. पनवेलच्या फार्म हाऊसवर त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी रंगली होती. आता बर्थ डेची चर्चा होणार तितकीच भाईजानच्या बर्थ डे गिफ्ट्सही चर्चा होणारच ना!

तर भाईजानवर गिफ्टची जणू बरसात झाली. साधीसुधी गिफ्ट्स नाहीत तर लाखो-करोडोंची गिफ्ट्स. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार,सलमानची खूप जुनी मैत्रिण शिल्पा शेट्टीने सलमानला काय दिलं तर 16 ते 17 लाख रुपयांचं डायमंड ब्रेसलेट गिफ्ट केलं असल्याचं कळतंय.

मिसेस कतरिना कैफने सलमानला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. ती भाईजानच्या पार्टीला हजर नव्हती पण तिने गिफ्ट न चुकता पाठवलं. होय, कतरिनाने सलमानला 2-3 लाखांचं ब्रेसलेट भेट दिल्याचं कळतंय.

सलमानची मैत्रिण जॅकलिन फर्नांडिस हिने लाडक्या सल्लूला 10 ते 12 लाखांचं घड्याळ गिफ्ट केलं.

अनिल कपूरने सलमानला 27 ते 29 लाख रुपयांचं लेदर जॅकेटं गिफ्ट दिल्याची माहिती आहे.

संजय दत्त यानेही आपल्या जिगरी मित्राला एक डायमंड ब्रेसलेट गिफ्ट केलं. त्याची किंमत 7-8 लाख असल्याचे म्हटलं जातंय.

भाईजानला पापा सलीम खान यांच्याकडूनही गिफ्ट मिळालं. सलीम खान यांनी आपल्या लाडक्या लेकाला जुहूचं एक अपार्टमेंट भेट म्हणून दिल्याचं कळतंय. त्याची किंमत 12 ते 13 कोटी असल्याची चर्चा आहे.

सलमानची लाडकी बहिण अर्पिताने भावाला 15 ते 17लाख रुपयांचं रोलेक्सचं घड्याळ गिफ्ट केल्याचं कळतंय.

अरबाजही मागे नाही, त्याने म्हणे भाईजानला 2 ते 3 कोटी रुपयांची ऑडी आरएस क्यू 8 गाडी भेट म्हणून दिली.

भाऊ सोहेल खानने 25 ते 30 लाख रुपयांची बीएमडब्ल्यूची गाडी सलमानला भेट दिली.