वयाच्या १२व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली, रणवीर सिंहने स्वतःचा केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 11:26 AM2020-12-17T11:26:35+5:302020-12-17T11:33:59+5:30

काही सेलेब्स असे आहेत, त्यांनी पहिला सेक्स कधी केला हे निसंकोचपणे सांगतात. दीपिका पदुकोणसह लग्न करण्याआधीच रणवीर सिंहने व्हर्जिनिटी कधी गमावली हे सांगताच अनेकांना मोठा धक्काच बसला होता.

अभिनेता रणवीर सिंहने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता. रणवीरने त्याच्या या मुलाखतीत सांगितले होते की, त्याने वयाच्या १२ व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली होती.

वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच पहिल्यांदा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते.

कंडोमच्या जाहिरातीबद्दल रणवीरला प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्याने बिनधास्तपणे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते.

रणवीर सिंहचे उत्तर ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसला होता.

यावरच रणवीर थांबला नाही, माझ्या वयाच्या मुलांना सेक्सविषयी फार काही माहीती होती.

मी इतक्या लहान वयात खूप एक्स्पर्ट झालो असं मला वाटायला लागलं होतं असं रणवीरने सांगितलं.

सेक्स हा विषय असा आहे ज्यावर आपण कधीच कोणी मोकळेपणाणे बोलत नाही. मात्र हळुहळु याकडे बघण्याचाही दृष्टीकोण बदलत आहे.

आता कुठे यावर लोकांनी बोलायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता याविषयी मोकळेपणाने आपण बोलू शकतो.” असेही त्याने सांगितले होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रणवीर '83'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

कोरानामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Read in English