Pooja Bhalekar: मादक अदा अन् बोल्डनेसचं वादळ...फॅन्सना घायाळ करायला येतेय मराठमोळी 'लडकी'; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 05:03 PM2021-11-09T17:03:16+5:302021-11-09T17:16:43+5:30

बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहेत आणि राम गोपाल वर्मा यांनी हा चित्रपट भारतातील पहिला मार्शल आर्टिस्ट चित्रपट असल्याचा दावा केला आहे. चित्रपटातील एक मराठमोळी अभिनेत्री पदार्पण करतेय आणि तिच्या बोल्ड अवतारानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठमोळी अभिनेत्री पूजा भालेकर (Pooja Bhalekar) मुख्य भूमिकेत असणारा 'लडकी' नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पूजा भालेकरचा चित्रपटातील लूक आणि बोल्डनेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'लडकी' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पूजा भालेकर बोल्ड आणि हॉट अंदाजात पाहायला मिळते आहे. तसंच मार्शल आर्टला समर्पित चित्रपट असणार असल्याचं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे.

दिग्गज मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या प्रतीचा आदर म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जाईल असं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे.

पूजा भालेकर एक नावजलेली मार्शल आर्टीस्ट आहे. मादक आणि बोल्डनेस अवतारासोबतच अॅक्शनचा तडका 'लडकी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात पूजा भालेकर जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसणार असल्याचं पोस्टरमधूनच दिसून येतं.

भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनमध्ये प्रदर्शित होणारा 'लडकी' हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरणार आहे. राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचं पूर्ण नाव 'लडकी- एन्टर द ड्रॅगन' असं दिलं आहे.

ब्रूस ली यांच्या 'एन्टर द ड्रॅगन' या सुपरहिट चित्रपटासोबत 'लडकी' चित्रपटाचं साधर्म्य साधण्याचा राम गोपाल वर्मा यांनी प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

पूजा भालेकर मार्शल आर्टीस्ट तर आहेच पण तिच्या मादक आणि बोल्ड अवतारांनी चाहते घायाळ होणार आहेत इतकं मात्र नक्की.

मार्शल आर्ट आणि सिनेमानं भारत व चीनला कसं एकमेकांशी पुन्हा जोडलं आहे हे 'लडकी' चित्रपट सिद्ध करेल असं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे.

पूजा भालेकर हिचे इन्स्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पूजा स्वत: एका मार्शल आर्टीस्ट असल्यानं बोल्ड फोटोसह मार्शन आर्टच्या प्रात्यक्षिकांसह फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

पूजा भालेकर हिनं मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि ती एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. 'लडकी' चित्रपटात तिच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळणार आहे.