अभिनयाव्यतिरिक्त साईड बिझनेसमधून कोटयवधी रुपये कमवते अभिनेत्री; भावासोबत करते मोठा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 04:00 PM2023-10-10T16:00:51+5:302023-10-10T16:23:00+5:30

कलाविश्वात सध्या असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासोबतच अन्य काही क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत.

कलाविश्वात सध्या असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासोबतच अन्य काही क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत. त्यामुळेच अभिनयाव्यतिरिक्त साईड बिझनेस करणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात.

बॉलिवूडमध्ये आणि साऊधमध्ये काम करणारी अशी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जिचे अनेक व्यवसाय आहे. शिवाय भावासोबत देखील अभिनेत्री बिझनेस करते.

ही अभिनेत्री आहे रकुल प्रीत सिंग. रकुल आज तिचा वा़ढदिवस सेलिब्रेट करते आहे. रकुलने वयाच्या १८ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यावेळी ती कॉलेजमध्ये होती. 2009 साली ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून रकुलने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती.

यानंतर 2011 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुन्हा कमबॅक केले. अगदी फार कमी वेळात रकुल साऊथची बडी स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली.

पाठोपाठ बॉलिवूडमध्येही तिचा डेब्यू झाला. अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात रकुल भाव खाऊन गेली.रकुल दाक्षिणात्य कलाविश्वातील महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये फी घेते.

रकुल हिच्याबद्दल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिनयाव्यतिरिक्त साईड बिझनेसमधून ती कोट्यवधी रुपये कमावते. अभिनेत्री जिमची मालक आहे.

रकुलचे तीन ट्रेनिंग जीम आहेत.. रकूल तिचा भाऊ अमन प्रीत सिंहबरोबर F45नावाच्या फ्रेंचायसीची मालकीण आहे.रकुलचे यात २ हैदराबादमध्ये आणि १ विशाखापट्टणमध्ये जीम आहे. ज्यातून अभिनेत्री मोठी कमाई करते.

प्रोफेशनल लाईफसोबतच रकुलचं पर्सनल लाईफ सुद्धा चर्चेत आहे.. बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व अभिनेता जॅकी भगनानी याला रकुल डेट करतेय. त्यांचं हैदराबादमध्ये घर आहे. मुंबईत देखील स्वतःचा अपार्टमेंट आहे.