टॉप अभिनेत्यांसोबत होते परवीन बाबीचे अफेअर, पण शेवटच्या काळात वाटेला आलं एकाकी जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 03:35 PM2023-04-04T15:35:01+5:302023-04-04T15:43:09+5:30

परवीन बाबीचे अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत अफेअर होते. पण शेवटी अभिनेत्री मृत्यूपूर्वी पूर्णपणे एकटी होती.

परवीन बाबी भारतीय सिनेमामध्ये महिलांच्या रूढीवादी वागण्याला तडा देणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. ७० च्या दशकात जेव्हा अभिनेत्री सलवार सूट आणि साड्यांमध्ये दिसत होत्या तेव्हा परवीन बाबी आपला बोल्ड अंदाज दाखवत होत्या. अभिनेत्री परवीन बाबी तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत होती. परवीन बाबीचे अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत अफेअर होते. परवीन बाबीचे नाव प्रसिद्ध बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन ते डॅनी डेन्झोंगपा यांच्याशी जोडले गेले. पण शेवटी अभिनेत्री मृत्यूपूर्वी पूर्णपणे एकटी होती.

परवीन बाबीचा जन्म ४ एप्रिल १९४९ मध्ये सौराष्ट्रातील जूनागढमध्ये एका मध्यम वर्गीय मुस्लिम परिवारात झाला होता. सेंट झेविअर्स कॉलेजमधून इंग्रजी साहित्यातून बीए केल्यावर परवीन बाबी मॉडलिंगमध्ये करिअर करत होती. तेव्हाच परवीनची भेट सिने दिग्दर्शक बीआर इशारा यांच्यासोबत झाली.

परवीन बाबीची लव्ह लाइफ फारच वादग्रस्त ठरली होती. कथितपणे परवीन बाबीचं पहिलं अफेअर डॅनीसोबत होतं. एका मुलाखतीत डॅनीने सांगितलं होतं की, साधारण चार वर्ष त्याने परवीन बाबीला डेट केलं. पण दोघांचं नातं पुढे टिकू शकलं नाही.

त्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर बेदी आला.परवीन बाबी आणि कबीर बेदी यांच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. बातम्यांनुसार, दोघेही बरेच दिवस डेट करत होते. हे दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.

परवीन आणि कबीर तीन वर्ष सोबत राहिले. पण हेही नातं टिकलं नाही. त्यानंतर दुख:त असलेल्या परवीन बाबीला महेश भटचा आधार मिळाला. महेश भट तेव्हा विवाहित होते. पण त्यांचं अफेअर सुरू होतं. महेश भटसोबत रिलेशनशिपमध्ये असताना परवीन बाबील पॅरानायड स्कित्जोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाला.

अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीने अनेक सिनेमात एकत्र काम केलं. एक काळ असाही होता जेव्हा दोघांच्या अफेअरची अफवा उडाली होती. जेव्हा मीडियाला याची भनक लागली तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हे तिच्यापासून दूर राहणं पसंत केलं.

परवीन बाबी ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे बिकिनी फोटो खूप चर्चेत होते. परवीन बाबीचा हा फोटो आजही चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींमध्ये परवीन बाबीचे नाव सामील आहे, ज्यांचे लाखो चाहते होते. चाहत्यांसोबतच स्टार्सही परवीन बाबीच्या स्टाईलचे फॅन झाले होते.

परवीन बाबीचे काही फोटो खूप दिवसांनी समोर आले आहेत. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर चाहत्यांना ते ओळखता आले नाहीत. परवीन बाबीचे वजन खूप वाढले होते, त्यामुळे तिचा लूक पूर्णपणे बदलला होता.