Nushrratt Bharuccha: तुम हुस्न परी ! निळ्या रंगाच्या लेहेंग्यात नुसरत भरुचा दिसली सुंदर, एथनिक लूकवर चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 06:19 PM2022-11-14T18:19:17+5:302022-11-14T18:44:39+5:30

Nushrratt Bharuccha Photos: नुसरत भरुचाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा नुसरत भरुचानेइंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये नुसरत भरूचानं निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुसरतने सेटल मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुसरतने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नुसरत भरुचाचा हा एथनिक लूक चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, नुसरत भरुचा लवकरच 'सेल्फी' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)