Manushi Chhillar: विश्वसुंदरीचा 'रेड अँड हॉट' ख्रिसमस लूक! पाहा मानुषी छिल्लरचे ग्लॅमरस Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:31 PM2022-12-26T12:31:44+5:302022-12-26T13:01:58+5:30

विश्वसुंदरी अभिनेत्री मानुषी छिल्लरनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास ख्रिसमस लूक फोटो शेअर केले आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)

सौंदर्यवती मानुषीचा 'रेड अँड हॉट' लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

विश्वसुंदरीचा खिताब जिंकल्यानंतर मानुषीनं बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेत 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारली.

लाल रंगाच्या 'वन पिस'मध्ये मानुषीनं खास ख्रिसमस ट्री सोबत फोटोशूट केलं.

ख्रिसमस विकमध्ये मानुषी सध्या सुटीचा आनंद घेत आहे. सोनेरी रंगाच्या वेस्टर्न आऊटफीटमध्येही मानुषीनं खास फोटो शूट केलं.

मानुषी नुकतीच दुबईत गेली होती.

दुबईत सुटी एन्जॉय करत असतानाचा एक सेल्फीही मानुषीनं शेअर केला होता.

मानुषी छिल्लर तिच्या लाडक्या लिओनेल मेस्सीला प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी काही दिवसांची सुट्टी घेऊन कतारला देखील गेली होती.

फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिनाचा आयकॉन लिओनेल मेस्सी याला खेळताना पाहण्याचं तिचं स्वप्न होतं. ते तीनं पूर्ण केलं.

“लिओनेल मेस्सीला प्रत्यक्ष खेळताना पाहणे हे माझे नेहमीच स्वप्न होते. त्याची निस्सीम चाहती असल्याने, फुटबॉल मैदानावरील त्याच्या अलौकिक खेळाची झलक पाहण्यासाठी मी अनेक वर्षांपासून वाट पाहात होते", असं मानुषीनं म्हटलं होतं.

अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या अंतिम लढतीचा मानुषीनं खूप आनंद लुटला होता.

मानुषीनं काही दिवसांपूर्वी हटके गोल्डन वन पिसमध्ये फोटोशूट केलं होतं आणि या ड्रेसचीही सोशल मीडियात खूप चर्चा झाली होती.

मानुषीनं 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

मानुषी म्हणाली की लग्नाचा सीन हा तिचा चित्रपटातील सर्वात लांब शॉट होता. यासाठी २५ जणांनी मिळून ३ तासात तयार केले! यामध्ये पोशाख, दागिने, केस, मेकअप, टेलर इत्यादींचा समावेश होता. (फोटो इंस्टाग्राम)

कतारच्या स्टेडिटमबाहेरील मानुषीचा वेस्टर्न लूक