पैशांसाठी साफ केलं टॉयलेट, काढला कचरा; शाहरुखची 'ही' हिरोईन 170 कोटींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 03:57 PM2023-10-21T15:57:20+5:302023-10-21T16:02:47+5:30

तरुणीला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली आणि तिचं नशीब एका रात्रीत पालटलं.

बॉलिवूडमध्ये नशीब चमकायचं असेल तर टॅलेंटची चमक सीमेपलीकडून बॉलिवूडमध्ये पोहोचते. एका तरुणीसोबतही असंच काहीसं घडलं आहे. जिच्या सौंदर्याने आणि प्रतिभेच्या सामर्थ्याने तिला बॉलिवूडमध्ये आणलं.

तरुणीला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली आणि तिचं नशीब एका रात्रीत पालटलं. ही अभिनेत्री तिच्या देशातही खूप प्रसिद्ध आहे. आता ती कोट्यवधींची मालकीण आहे.

कोट्यवधींची मालकीण असलेली ही अभिनेत्री म्हणजे पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री माहिरा खान आहे. आता माहिरा आलिशान आयुष्य जगते. पण एक वेळ अशी होती जेव्हा तिला पैशांसाठी टॉयलेट साफ करावं लागतं होतं. तसेच ती दुकानात झाडू मारण्याचं काम करायची.

माहिरा खानचं नुकतच लग्न झालं आहे. माहिरा खान पाकिस्तानात जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती भारतातही लोकप्रिय आहे. रईस या चित्रपटात ती शाहरुख खानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

माहिराने चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेत्रीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. चित्रपटात येण्यापूर्वी माहिरा खान कॅलिफोर्नियामध्ये शिक्षणासाठी गेली होती.

कॅलिफोर्नियामध्ये तिने तिचा खर्च भागवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये काम केलं. Rite Aid मध्ये कॅशियरपासून स्टोअरमध्ये फरशी साफ करण्यापर्यंत सर्व काम केलं. आता माहिरा खान पाकिस्तानातील श्रीमंत आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

माहिरा आलिशान बंगला आणि महागड्या कारची मालकही आहे. चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंट व्यतिरिक्त, माहिरा खान M By Mahira Khan नावाची कपड्यांची लाइन देखील चालवते.

हे सर्व एकत्र केले तर तिची एकूण संपत्ती 170 कोटी रुपये आहे असं म्हणलं जातं. माहिराच्या अदांनी चाहते घायाळ होतात. तिचे असंख्य चाहते असून ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.