महेश मांजरेकरांची थोरली लेक दिसायला आहे खूप सुंदर!, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:17 PM2022-06-13T17:17:51+5:302022-06-13T17:26:21+5:30

महेश मांजरेकरांची थोरली लेक आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

महेश मांजरेकर यांची थोरली लेक सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सोशल मीडियावरही सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच माहित आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांची पत्नी मेधा मांजरेकर हीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

महेश आणि मेधा यांना दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. त्यातील सई मांजरेकर हिने दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

'दबंग 3' चित्रपटानंतर सई मांजरेकरला सिनेइंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळाली आहे.

सई मांजरेकर सोशल मीडियावरही सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नुकतेच तिने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

सई मांजरेकरच्या फोटोंना खूप पसंती मिळते. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

सई मांजरेकर दबंग ३ चित्रपटानंतर सलमान खानचा जावई आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्यात पहायला मिळाली. या गाण्यातील आयुष आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली.

नुकतीच ती मेजर चित्रपटात पाहायला मिळाली.