IIFA awards 2022 : आयफामध्ये ‘चंद्रा’ची चर्चा, ग्रीन कार्पेटवर अमृता खानविलकरचा स्टनिंग लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:29 PM2022-06-05T12:29:49+5:302022-06-05T12:35:51+5:30

IIFA awards 2022, Amruta Khanvilkar : आयफाच्या ग्रीन कार्पेटवर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघींचा जलवा पाहायला मिळाला.

अबुधाबी येथे 22 वा आयफा पुरस्कार सोहळा रंगला आणि सगळीकडे याच सोहळ्याची चर्चा रंगली. आयफाच्या ग्रीन कार्पेटवरच्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मराठी अभिनेत्रींनी या सोहळ्याला हजेरी लावली.

आयफाच्या ग्रीन कार्पेटवर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघींचा जलवा पाहायला मिळाला.

सईचा लुक तुम्ही पाहिलाचं असेल. अमृता खानविलकरचा लुकही सर्वांचा लक्ष वेधून घेणारा ठरला. तिची हटके स्टाईल पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या.

या फोटोत अमृता ब्ल्यू अँड ब्लॅक वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येत आहे. तिच्या या ग्लॅमरस लुकवर चाहते फिदा आहेत.

अमृताने आयफाच्या पहिल्या दिवशी ब्लॅक कलरचा सुंदर असा आऊटफिट परिधान करत सर्वांचं लक्ष वेधलं. दुस-या दिवशी तर ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये ग्रीन कार्पेटवर उतरली.

‘चंद्रमुखी’चा हटके स्वॅग पाहून चाहते जणू तिच्या प्रेमात पडले. आयफामधील तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

जीवघेणी, कडक मॅडम, हॉट, स्टनिंग अशा कमेंट्स चाहत्यांनी या फोटोवर केल्या आहेत. मराठी मुलगीही एवढी सुंदर दिसू शकते, वाह..., अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

यंदा आयफा सोहळा अबूधाबी येथे पार पडला. यंदाच्या सोहळ्याचं हे 22 वं वर्ष होतं. कलासृष्टीतील मानाच्या या सोहळ्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

विकी कौशल, क्रिती सॅनन, मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आदींनी यंदा आयफा पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. सई ताम्हणकरने ‘मिमी’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला.