नोरा फतेहीचा लूक सिंपल पण क्लासी लूक, 'दिलबर गर्ल'चं नवं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 06:11 PM2024-06-25T18:11:19+5:302024-06-25T18:20:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नोरा अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यासाठीही ओळखली जाते.

नोरा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

वेस्टर्न असो वा देसी नोराचा प्रत्येक लूक हा तितकाच दिलखेचक वाटतो.

नोराने नुकतेच तिच्या नव्या लूकने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा नव्याने मोहिनी घातली आहे.

नोरा फतेहीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

ताज्या फोटोंमध्ये नोरा ही कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

नोरा फतेहीने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप, शॉर्ट्स आणि ग्रीन कलरचे जॅकेट परिधान केलं आहे.

नोरा फतेहीने हे आऊटडोअर शूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

नोराने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती अलिकडेट 'मडगांव एक्सप्रेस', 'क्रॅक' सिनेमात झळकली.

लवकरच नोरा 'डान्सिंग डॅड', 'मटका' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नोरा अनेक रिएलिटी शोमध्ये हजेरी लावत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.