लहानपणी सिनेमांमध्ये दिसलेला 'हा' बालकलाकार, कुठे आहे 'चैन कुली की मैन कुली' मधला करण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:29 IST2026-05-07T11:17:05+5:302026-05-07T11:29:58+5:30
लहानपणी त्याच्या सिनेमांमधून निरागस बालकलाकार म्हणून तो प्रसिद्ध होता. आता कसा दिसतो अभिनेता?

२००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'चैन कुली की मैं कुली' सिनेमा आठवतोय? चित्रपटात जैन खानने 'करण' नावाच्या अनाथ मुलाची मुख्य भूमिका साकारली होती. एका जादुई बॅटच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणाऱ्या या चिमुकल्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

या चित्रपटात झैन खान आणि अभिनेता राहुल बोस यांची जोडी पाहायला मिळाली होती. चित्रपटातील जैनचा निरागस अभिनय आणि आत्मविश्वास पाहून तो भविष्यातील मोठा स्टार होईल, असे अनेकांना वाटले होते.

झैनने केवळ एकाच चित्रपटात काम केले नव्हते. प्रदीप सरकार यांच्या 'परिणीता' चित्रपटात त्याने सैफ अली खानच्या लहानपणाची भूमिका साकारली होती. याशिवाय 'माय वाईफ्स मर्डर', 'क्रिश' आणि शाहिद कपूरच्या 'चांस पे डान्स'मध्येही तो दिसला होता.

लहानपणी झैन खान केवळ चित्रपटांतच नाही, तर जाहिरातींच्या दुनियेतही खूप सक्रिय होता. अनेक नामवंत ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये त्याने काम केले होते, ज्यामुळे तो घराघरात पोहोचला होता.

ग्लॅमरच्या जगात यश मिळत असतानाच नंतर मात्र झैनने वेगळी वाट निवडली. त्याला क्रिकेट आणि शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यामुळे मोठे होत असताना त्याने अभिनयापासून अंतर राखले आणि आपले पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.

आज झैन अभिनय क्षेत्रापासून पूर्णपणे दूर आहे. त्याने कॉर्पोरेट क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्याने पेटीएम, झोमॅटो आणि स्विगी सारख्या भारतातील आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

त्याच्या लिंक्डइन प्रोफाईनलनुसार, सध्या तो फोन पे मध्ये सेल्स हेड म्हणून काम करत आहे आणि मुंबईत वास्तव्यास आहे.

झैन खान आता ३० वर्षांचा झाला असून, तो सोशल मीडिया आणि ग्लॅमरच्या झगमगाटापासून दूर राहणे पसंत करतो. मिळालेल्या माहितीनुसार त्याने नुकतीच लग्नगाठ बांधली असून तो आपल्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत आनंदी आहे.

जरी झैन आता रुपेरी पडद्यावर दिसत नसला, तरी 'चैन कुली की मैं कुली' मधील त्याचा 'करण' आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. एक यशस्वी बालकलाकार ते एक यशस्वी कॉर्पोरेट प्रोफेशनल असा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

















