१५ लोकांसमोर बोल्ड सीन ते प्रायव्हेट फोटो लीक, 'या' घटनांमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अमाला पॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 01:36 PM2023-10-26T13:36:02+5:302023-10-26T13:55:05+5:30

अमाला पॉल आपल्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकुळ घालत असते.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अमाला पॉल 26 ऑक्टोबरला तिचा 32 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अमाला पॉलने अगदी लहान वयातच खूप यश मिळवले आहे. अमला पॉलची मोठी फॅन फॉलोइंग आहे. अमला पॉल तिच्या कामासाठी जितकी लोकप्रिय आहे तितकीच तिचं करिअर वादग्रस्त ठरलंय.

'अमाला पॉल' ही अभिनेत्री मुळची केरळची.२००९ साली 'नीलथामरा' या सिनेमात तिने सहकलाकाराची भुमिका केली होती. या सिनेमातुन तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

२०१० साली आलेल्या 'मायना' या रोमॅन्टिक सिनेमामुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर मिळत गेल्या.

अमला पॉल 'अदाई' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. अमला पॉलने या चित्रपटात न्यूड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. मात्र, अमलाच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

अमला पॉलने 'अदाई' चित्रपटातील न्यूड सीनबद्दल सांगितले होते की, हे तिच्यासाठी खूप कठीण होते. अमाला पॉलने सांगितले होते की, तिने १५ लोकांच्या टीमसमोर हा सीन शूट केला होता.

अमला पॉलने 2014 मध्ये फिल्ममेकर एएल विजयसोबत लग्न केलं. केएल विजयच्या कुटुंबीयांना अमाला पॉलचं सिनेमात काम करणं आवडलं नाही. यावर अमला पॉलने एएल विजयपासून घटस्फोट घेतला.

अमला पॉलने 2017 मध्ये पती एएल विजय याच्याशी घटस्फोट घेतला. त्यांचे लग्न केवळ तीन वर्षे टिकले.

एएल विजयसोबतचं लग्न मोडल्यानंतर अमला पॉलच्या आयुष्यात गायक भाविंदर सिंगची एंट्री झाली. अमला पॉल आणि भावनिंदर सिंह दीर्घकाळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, असे म्हटले जाते. त्यांच्या लग्नाच्या बातम्या आल्या.

2020 मध्ये, भावनिंदर सिंगवर अमला पॉलचे प्रायव्हेट फोटो लीक केल्याचा आरोप लावण्यात आला होता. अमला पॉलने भावनिंदर सिंग विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्याला अटकदेखील झाली होती.

अमालाने तेलगु इंडस्ट्रीत अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. तिने चार तेलगु सिनेमांमध्ये काम केले आहे ज्यात 'नागा चैतन्य', 'राम चरण' आणि 'अल्लु अर्जुन' यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे. भोला चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे.

अमाला पॉलने तमिळ, तेलगु आणि मल्याळम सिनेमात काम केले आहे. भोला चित्रपटातून तिने बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं.