Alaya F : पुजा बेदीची मुलगी 'अलाया'चा ग्लॅमरस अंदाज; तिच्या हॉटनेससमोर स्टारकिड्सही फिके!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:36 PM2022-12-05T15:36:21+5:302022-12-05T15:39:43+5:30

नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा 'फ्रेडी' चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. अभिनेत्री 'अलाया एफ' नेही लक्ष वेधून घेतले. अलाया खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस असून फिटनेस क्वीनही आहे. नक्की कशी आहे अलायाची रिअल लाईफ बघुया

अलायाचे पूर्ण नाव अलाया इब्राहिम फर्नीचरवाला आहे.अलाया २३ वर्षांची आहे. ती फिल्मी बॅंकग्राऊंडमधुन येते.जो जिता वही सिकंदर फेम अभिनेत्री पुजा बेदी ची ती मुलगी आहे. तर कबीर बेदीची नात आहे.

अलाया फार कमी चित्रपटात दिसली आहे. मात्र सोशल मीडियावर ती खुप सक्रिय असते. तिच्या फिटनेस रुटीन ला अनेक जण फॉलो करतात.

अलायाचे सोशल मीडियावरील हॉट फोटो कायम चर्चेचा विषय बनले आहेत. तर कधी तिला कपड्यांवरुन ट्रोलही केले गेले आहे.

तर आता आलेल्या फ्रेडी या चित्रपटात तिने कायनाझ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या भुमिकेसाठी तिचे खुप कौतुक होत आहे.अलाया आगामी यु टर्न या सिनेमात मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

२०२० मध्ये आलेल्या 'जवानी जानेमन' मधुन तिने बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवले. या सिनेमात तिला सैफ अली खान आणि तब्बु सोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

अलाया ला मोस्ट डिझायरेबल वुमेन च्या लिस्टमध्ये येते. तर तिचा पहिलाच सिनेमा जवानी जानेमनसाठी तिला फिल्मफेअर बेस्ट फिमेल डेब्युचा अवॉर्ड मिळाला आहे.