५७ व्या वर्षी वजन कमी करण्यासाठी अक्षय कुमार पाण्यात मिसळतो 'हा' पदार्थ, तुम्हीही करा फॉलो

By देवेंद्र जाधव | Updated: June 20, 2025 17:13 IST2025-06-20T17:04:33+5:302025-06-20T17:13:59+5:30

अक्षय कुमारने वजन कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला. जो सर्वजण घरबसल्या करु शकतात.

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षय कुमार त्याच्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो.

अक्षय कुमारचा वयाच्या ५७ व्या वर्षी असलेला फिटनेस सर्वांना थक्क करुन सोडतो. अक्षय कुमारने त्याच्या फिटनेसचं महत्व आजवर सर्वांना सांगितलंय

अक्षय कुमारने अलीकडेच पिंकविलाला एक मुलाखत दिली. यात त्याने दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करतो हे सांगितलं आहे.

अक्षय कुमारने एक अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. अक्षय जे पाणी पितो त्यात एक खास पदार्थ मिसळतो. यामुळे त्याचा फिटनेस टिकून राहतो.

अक्षय कुमारने रोजच्या पाण्यात काकडी, सफरचंद आणि पुदिना मिक्स करुन त्याचं पाणी पितो. या पाण्याला डिटॉक्स वॉटर म्हणतात.

अक्षय जे पाणी पितो त्यामुळे पचनक्रिया सुधारते, चेहरा उजळ होतो आणि मुख्य म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते, त्यामुळे अक्षय पित असलेल्या पाण्याचे अनेक फायदे आहेत.

अशाप्रकारे फिटनेससाठी अक्षय जो सोपा उपाय घरबसल्या करतो, त्यामुळे तुम्हालाही फिटनेस आणि वजन नियंत्रित ठेवण्यात मदत होईल, यात शंका नाही.