कधीच शाळेत नाही गेली 'ही' अभिनेत्री! आज बॉलिवूडवर करतेय राज्य, करोडोंची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 13:47 IST2026-04-26T13:38:23+5:302026-04-26T13:47:22+5:30

कोण आहे ही अभिनेत्री? तुम्ही ओळखलं?

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री कतरिना कैफ आज यशाच्या शिखरावर आहे. पण तुम्हाला माहितीये का कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नव्हती. काय होतं यामागचं कारण?

कतरिना कैफ तिच्या आयुष्यात कधीही शाळेत गेली नाही, तरीही ती आज अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवून आहे आणि एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. कतरिनाच्या बालपणात तिच्या शाळेत जाण्याचं कारण दडलेलं आहे.

कतरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता, पण तिचे बालपण अनेक देशांमध्ये गेले. तिची आई सुझान टरकोट या एका सामाजिक संस्थेत काम करायच्या, ज्यामुळे त्यांना सतत एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करावा लागायचा.

कतरिना आणि तिच्या भावंडांना सतत देश बदलावा लागत असल्याने त्यांचे नाव कोणत्याही एका शाळेत नोंदवणे शक्य नव्हते. यामुळेच कतरिनाला कधीही शालेय शिक्षण घेता आले नाही.

शाळेत जाता आले नाही तरी कतरिनाची आई तिच्या शिक्षणाबाबत खूप जागरूक होती. कतरिना आणि तिच्या सात भावंडांचे शिक्षण घरीच पूर्ण झाले. तिला शिकवण्यासाठी विविध विषयांचे शिक्षक घरी यायचे.

या 'होमस्कूलिंग'मुळेच तिला जगातील विविध संस्कृतींची ओळख झाली. कतरिनाने खूप कमी वयात मॉडेलिंगला सुरुवात केली होती, ज्यामुळे तिला शिक्षणापेक्षा तिच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागले.

२००३ मध्ये 'बूम' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कतरिनाला सुरुवातीला हिंदी भाषा येत नसल्यामुळे खूप टीका सहन करावी लागली. मात्र, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने केवळ हिंदीच शिकली नाही, तर आज ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.