फुलेरात इलेक्शन रंगणार अन् सचिवजी-रिंकूची लव्हस्टोरी खुलणार, 'पंचायत ४'चा ट्रेलर, नवी रिलीज डेटही समोर

By देवेंद्र जाधव | Updated: June 11, 2025 12:49 IST2025-06-11T12:47:20+5:302025-06-11T12:49:26+5:30

Panchayat 4 Release Date: 'पंचायत ४' चा बहुचर्चित ट्रेलर रिलीज झाला आहे. इतकंच नव्हे मेकर्सने नवी रिलीज डेट जाहीर करुन सर्वांना गुड न्यूज दिली आहे. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर आणि नवी रिलीज जाणून घ्या

panchayat 4 trailer starring jitendra kumar raghubir yadav neena gupta faisal malik | फुलेरात इलेक्शन रंगणार अन् सचिवजी-रिंकूची लव्हस्टोरी खुलणार, 'पंचायत ४'चा ट्रेलर, नवी रिलीज डेटही समोर

फुलेरात इलेक्शन रंगणार अन् सचिवजी-रिंकूची लव्हस्टोरी खुलणार, 'पंचायत ४'चा ट्रेलर, नवी रिलीज डेटही समोर

Panchayat 4 Trailer: भारतातील सर्वात लोकप्रिय ओटीटी वेबसीरिजपैकी एक म्हणजे ‘पंचायत ४’. आज TVF ने आपल्या प्रेक्षकांसमोर बहुप्रतिक्षित वेब सिरीज ‘पंचायत ४’ चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित केला. द वायरल फीवर TVF निर्मित या सीझनचे लेखन चंदन कुमार यांनी केले आहे आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दीपक कुमार मिश्रा व अक्षत विजयवर्गीय यांनी सांभाळली आहे. हा ट्रेलर समोर आणतानाच TVF ने चाहत्यांना गुड न्यूज दिली असून ‘पंचायत ४’ची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे.

फुलेरा गावात रंगणार राजकीय रणसंग्राम

‘पंचायत ४’चा मध्ये पुन्हा एकदा फुलेरा गावाची कहाणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यावेळी गावात सत्तासंघर्षाचे वातावरण आहे. मंजू देवी आणि क्रांती देवी आमनेसामने उभ्या असून गावात रॅली, भाषणं, घोषणा आणि एकमेकांवर टीका-टिप्पणीचा धडाका लागलेला आहे. ट्रेलरमध्ये सचिवजी आणि रिंकी यांच्यात लव्हस्टोरी खुललेली पाहायला मिळतेय. अशाप्रकारे ‘पंचायत ४’चा ट्रेलर विनोदी प्रसंगांनी भरलेला असून हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये काही प्रसंग आपल्याला भावुकही करतात. अल्पावधीत ‘पंचायत ४’चा ट्रेलर चांगलाच व्हायरल झाला आहे.

‘पंचायत ४’ची नवी रिलीज डेट

‘पंचायत ४’ आधी २ जुलैला रिलीज होणार होता. परंतु मेकर्सने प्रेक्षकांना मंजू देवी आणि क्रांती देवी यांना वोट करायला सांगितलं. वोट केल्यानंतर मेकर्स  ‘पंचायत ४’ची नवी रिलीज डेट समोर आणणार होते. त्यामुळे  ‘पंचायत ४’च्या ट्रेलरसोबत मेकर्सने सिनेमाची नवी रिलीज डेटही जाहीर केली आहे.  ‘पंचायत ४’ याच महिन्यात म्हणजे २४ जूनला रिलीज होणार आहे. या सीझनमध्ये जितेन्द्र कुमार (सचिव जी), नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा, हे कलाकार झळकणार आहेत.

Web Title: panchayat 4 trailer starring jitendra kumar raghubir yadav neena gupta faisal malik