आता परिणितीची टक्कर सोनमशी
By Admin | Updated: August 15, 2014 23:45 IST2014-08-15T23:45:26+5:302014-08-15T23:45:26+5:30
प्रियंका चोप्राशी मुकाबला टळल्यानंतर आता परिणिती चोप्राला सोनम कपूरसोबत टक्कर घ्यावी लागणार आहे.

आता परिणितीची टक्कर सोनमशी
प्रियंका चोप्राशी मुकाबला टळल्यानंतर आता परिणिती चोप्राला सोनम कपूरसोबत टक्कर घ्यावी लागणार आहे. परिणिती चोप्राचा ‘दावत- ए-इश्क’ हा चित्रपट ५ सप्टेंबरला रिलीज होत आहे. याच दिवशी प्रियंकाचा ‘मेरी कोम’ रिलीज होणार होता; पण प्रमोशनसाठी वेळ हवा असल्याचे कारण सांगत ‘दावत- ए- इश्क’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट १९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. याच दिवशी सोनम कपूरचा ‘खुबसुरत’ही रिलीज होत आहे. ऐंशीच्या दशकात सुपरहिट ठरलेल्या ‘खुबसुरत’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. ‘खुबसुरत’ची निर्मिती रिया कपूरने केली आहे. शशांक घोषचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सोनमसोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत आहे. यशराज बॅनरच्या दावत- ए- इश्कमध्ये परिणितीसह आदित्य रॉय कपूर व अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.