समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 10:35 IST2026-05-03T10:33:07+5:302026-05-03T10:35:19+5:30

एकाच छताखाली आले एक्स नागा चैतन्य अन् समंथा!

naga chaitanya and samantha attended reception in hyderabad with respective partners netizens commented | समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी

समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी

साउथ सुपरस्टार्स नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्याबद्दल सर्वांना माहितच आहे. २०१७ साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर चारच वर्षात २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. याची बरीच चर्चा झाली. काही वर्षांनी नागाने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्नगाठ बांधली. तर काही महिन्यांपूर्वी समंथाने दिग्दर्शक राजा निदिमोरुशी लग्न केलं. आता हे दोघंही आपापल्या पार्टनरसोबत एकाच छताखाली आले होते. त्यावरुन नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

हैदराबादमध्ये सिमरनच्या रिसेप्शनसाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. त्यात नागा चैतन्य आणि शोभिता ही जोडीही आली होती. तर नंतर समंथाही पती राज निदिमोरुसोबत आली. समंथाने सुंदर जांभळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर सुंदर ग्लो दिसत होता. 


तर दुसऱ्या व्हिडीओत नागा आणि शोभिताने एकदम स्टायलिश अंदाजात एन्ट्री घेतली. त्यांच्यासोबत अभिनेते नागार्जुनही पत्नीसोबत आले होते. चौघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. शोभिता चिंतामणी रंगाच्या नेट साडीत गोड दिसत होती. सर्वांनी नवविवाहित जोडप्यासोबत फोटो काढले. 


या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहे. 'समंथा आणि नागा एकाच रिसेप्शन पार्टीत? दोघे भेटले का?','मला आश्चर्य वाटतंय ते भेटले नसतीलच','दोघेही आता आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत' अशा चाहत्यांच्या कमेंट्स आहेत .

Web Title : नागा चैतन्य और सामंथा: रिसेप्शन पार्टी में पार्टनर के साथ आमने-सामने?

Web Summary : 2021 में तलाकशुदा नागा चैतन्य और सामंथा रिसेप्शन में अपने पार्टनर के साथ पहुंचे। नागा शोभिता के साथ थे, जबकि सामंथा अपने पति राज निदिमोरु के साथ आईं। उनकी मौजूदगी ने नेटिज़न्स के बीच उनकी मुलाकात को लेकर चर्चा छेड़ दी।

Web Title : Naga Chaitanya and Samantha: Face-to-face with partners at reception party?

Web Summary : Naga Chaitanya and Samantha, who divorced in 2021, attended a reception with their partners. Naga was with Shobhita, while Samantha attended with her husband, Raj Nidimoru. Their presence sparked discussion among netizens about their encounter.