सध्या काय करतेय रिंकू राजगुरू?, इंस्टाग्राम स्टोरीवर तिनेच दिली ही हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:18 PM2021-03-22T12:18:56+5:302021-03-22T12:19:17+5:30

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे.

What is Rinku Rajguru doing now ?, she gave this hint on Instagram story | सध्या काय करतेय रिंकू राजगुरू?, इंस्टाग्राम स्टोरीवर तिनेच दिली ही हिंट

सध्या काय करतेय रिंकू राजगुरू?, इंस्टाग्राम स्टोरीवर तिनेच दिली ही हिंट

googlenewsNext

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत तिने शूटिंगला सुरूवात केल्याचे सांगितले आहे.


रिंकू राजगुरूने रविवारी म्हणजेच २१ मार्चला इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा फोटो शेअर करत शूटिंगचा पहिला दिवस असल्याचे सांगितले आहे. तर आज तिने शूटच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आरशासमोर बसलेली दिसते आहे. तसेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर तिने शूटिंग सेटचा बुमरँगदेखील शेअर केला आहे. 


 रिंकू राजगुरूच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून समजते आहे की, ती सध्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र ती नेमके कोणत्या प्रोजेक्टचे शूटिंग करते आहे, हे समजू शकलेले नाही.


रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.

या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.


प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: What is Rinku Rajguru doing now ?, she gave this hint on Instagram story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.