वीणा जामकर काय करतेय गोव्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:42 PM2019-04-29T15:42:52+5:302019-04-29T15:45:57+5:30

वीणा जामकरने नुकताच इन्स्टाग्रामला एक फोटो पोस्ट केला आहे.

veena jamkar shooting for her Upcoming movie in Goa | वीणा जामकर काय करतेय गोव्यात?

वीणा जामकर काय करतेय गोव्यात?

googlenewsNext
ठळक मुद्देवीणाने लिहिले आहे की, मी सध्या गोव्यात चित्रीकरण करत आहे. गोव्यातील पोंडा येथे वीणा चित्रीकरण करत असल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले असले तरी ती कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे यावर मौन राखणेच तिने पसंत केले आहे.

अनेक कलाकार सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून या माध्यमाद्वारे ते आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल, लूक बद्दल आणि त्यांच्या आयुष्यातील  विविध गोष्टींबद्दल सांगत असतात. तर काही कलाकार लाइव्ह येऊन थेट चाहत्यांशी संवाद देखील साधतात. मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री वीणा जामकर देखील सोशल मीडियाद्वारे नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.


 
आपले आवडते कलाकार काय करत आहेत, त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची त्यांच्या फॅन्सची इच्छा असते. त्यामुळे आपल्या फॅन्ससाठी कलाकार सोशल नेटवर्किंग साईटवर आपले फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. आपल्या चित्रपटांच्या, मालिकांच्या चित्रीकरणाचे, त्यांच्या खाजगी जीवनातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ते आपल्याबद्दल फॅन्सना माहिती देत असतात आणि त्यांचे फॅन्स देखील त्यांच्या पोस्टना भरभरून प्रतिसाद देतात. 

वीणा जामकरने नुकताच इन्स्टाग्रामला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत वीणा जामकरने केस सोडले असून एक छोटीशी टिकली लावली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्यामागे एक तुळशी वृंदावन असून हा फोटो एखाद्या घरात काढला असल्याचे लगेचच कळत आहे. या फोटोसोबत वीणाने लिहिले आहे की, मी सध्या गोव्यात चित्रीकरण करत आहे. गोव्यातील पोंडा येथे वीणा चित्रीकरण करत असल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले असले तरी ती कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे यावर मौन राखणेच तिने पसंत केले आहे.

वीणा जामकरने वळू, गाभ्रीचा पाऊस, मर्मबंध यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी भाई व्यक्ती की वल्ली? या चित्रपटात ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. या सिनेमातील तिच्या कामाचे सगळ्यांनी खूप कौतुक केले होते. वीणा जामकरने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकरल्या आहेत. पण ती पहिल्यांदाच एक ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. ती रमाई या चित्रपटात रमाबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

Web Title: veena jamkar shooting for her Upcoming movie in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.