उर्मिला कानेटकरच्या या लूकने केले होते घायाळ,आता लवकरच बनणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 09:54 AM2017-12-22T09:54:40+5:302017-12-22T15:24:40+5:30

बॉलिवूड असो किंवा मराठी अभिनेत्री त्यांचा प्रत्येक अंदाज सा-यांना घायाळ करतो. निमित्त कोणतही असो त्यांचा स्टाइलने सा-यांचा लक्ष वेधून ...

Urmila Kanetkar's luke had done this, now it will soon become mother | उर्मिला कानेटकरच्या या लूकने केले होते घायाळ,आता लवकरच बनणार आई

उर्मिला कानेटकरच्या या लूकने केले होते घायाळ,आता लवकरच बनणार आई

googlenewsNext
लिवूड असो किंवा मराठी अभिनेत्री त्यांचा प्रत्येक अंदाज सा-यांना घायाळ करतो. निमित्त कोणतही असो त्यांचा स्टाइलने सा-यांचा लक्ष वेधून घेताना दिसतात.अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेचा असा एक दिलखेचक अंदाज असलेला फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तिने आकर्षक अशी साडी परिधान केल्याने तिचे सौदर्यं आणखीन खुलून आल्याचे पाहायला मिळत आहे.ग्लॅमर दुनियेत कलाकारांना त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलही खूप महत्त्वाची असते.ब-याचदा अभिनेत्री स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी वेस्टर्न लूक असलेले ड्रेसिंग करत असल्याचे पाहायला मिळतं.मात्र रसिका सुनील  या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरल्याचे पाहायला मिळत आहे.उर्मिलाच्या हा जुना फोटो असला तरी या फोटोला रसिकांची अधिक पंसती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

आता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या घरात एक चिमुकला पाहुणा येणार आहे. उर्मिला गरोदर असून कोठारेंच्या कुटुंबात लवकरच एका छोट्याशा बाळाचे आगमन होणार आहे.उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.'शुभ मंगल सावधान' हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली.चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११मध्ये लग्न केले.उर्मिलाचे नुकतेच डोहाळ जेवण करण्यात आले. या डोहाळ जेवणाचे फोटो उर्मिलानेच तिच्या सोशल नेटवर्किंग साईटला पोस्ट केले आहेत. डोहाळ जेवणाच्या वेळी उर्मिला आणि आदिनाथने एकाच रंगाचे कपडे घातले होते. उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोत आदिनाथ निळ्या रंगाच्या सदऱ्यात तर उर्मिला निळ्या रंगाच्या साडीत आपल्याला पाहायला मिळाली होती. गरोदरपणामुळे उर्मिला कोठारेच्या सौंदर्यात पडली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Urmila Kanetkar's luke had done this, now it will soon become mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.