सुखदा खांडकेकर आणि दिपाली सैय्यदची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 12:05 IST2016-12-30T12:05:59+5:302016-12-30T12:05:59+5:30

एन.एन सिद्दिकी  दिग्दर्शित हिरो या आगामी  चित्रपटात प्रेक्षकांना लवकरच एक जुगलबंदी नृत्य पाहायला मिळणार आहे. एक हिंदी-मराठी फ्युजन असलेली ...

Sukhda Khandkekar and Deepali Sayyede Jugalbandi | सुखदा खांडकेकर आणि दिपाली सैय्यदची जुगलबंदी

सुखदा खांडकेकर आणि दिपाली सैय्यदची जुगलबंदी

.एन सिद्दिकी  दिग्दर्शित हिरो या आगामी  चित्रपटात प्रेक्षकांना लवकरच एक जुगलबंदी नृत्य पाहायला मिळणार आहे. एक हिंदी-मराठी फ्युजन असलेली ही जुगलबंदी असणार आहे. या जुगलबंदी गीतावर प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि दिपाली सैय्यद थिरकताना दिसणार आहे. धनक धिन आग लगा दू मे.. गं बाई माझा तोरा नखरेल.. असे या गाण्याचे बोल असून या गीताला ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी स्वरसाज दिला आहे. तर गीतकार असलम सयानी व कौस्तुभ पंत यांनी हे हिंदी-मराठी फ्युजन लिहीले आहे. तसेच या गीताला संगीताची साथ संगीतकार राजा अली यांनी दिली असून नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे. या जुगलबंदी नृत्याचे नुकतेच चित्रिकरण करण्यात आले आहे. या जुगलबंदीच्या निमित्ताने दिपाली सय्यद सोबत शास्त्रीय नृत्यात तरबेज अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिचा भन्नाट नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आर.पी.जी प्रॉडक्शन प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित हिरो या आगामी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, सुखदा खांडकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर या कलाकारांचादेखील समावेश आहे. दिपाली सैय्यद आणि सुखदा खांडकेकर यांनी नृत्याप्रमाणेच आपल्या अभिनयाने ही प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. दिपालीने लाडीगोडी, मास्तर एके मास्तर, होऊन जाऊ दे, मुंबईचा डबेवाला, करायला गेलो एक असे अनेक चित्रपट केले आहेत. तर सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तसेच ती बॉलिवुडचा सुपरहीट चित्रपट बाजीराव मस्तानी या चित्रपटातदेखील झळकली होती. 

Web Title: Sukhda Khandkekar and Deepali Sayyede Jugalbandi