असे आहे गुलाबजाम सिनेमाचे दुसरे पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:04 IST2018-01-25T09:34:13+5:302018-01-25T15:04:13+5:30

हिंदी सिनेमांप्रमाणे काहीशी बोल्ड विषयसुद्धा मराठी सिनेमातून हाताळले जात आहे.सिनेमातून कायम चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यानं असाच ...

This is the second poster of Gulab Zam's film | असे आहे गुलाबजाम सिनेमाचे दुसरे पोस्टर

असे आहे गुलाबजाम सिनेमाचे दुसरे पोस्टर

ंदी सिनेमांप्रमाणे काहीशी बोल्ड विषयसुद्धा मराठी सिनेमातून हाताळले जात आहे.सिनेमातून कायम चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यानं असाच प्रयोग त्याच्या आगामी मराठी सिनेमात केला आहे या सिनेमाचं नाव आहे गुलाबजाम. या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर तुफान गाजलं होतं.कारण या सिनेमाचं पोस्टर भलतंच बोल्ड होतं. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा आगामी ‘गुलाबजाम’ सिनेमाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले होते.सोनालीने ‘माझी लाडकी गोष्ट..राधा आणि आदित्यची..आमच्या स्वयंपाकाची..’, असं लिहित हा टीझर पोस्ट केला होता. नुकतेच या सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर हातात लाटणं घेऊन उभी असलेली दिसत आहेत.पोस्टरमध्ये सोनालीच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत असून  सिद्धार्थ मात्र थोडा चिडलेला दिसतोय.‘चवीने खाणाऱ्यांना प्रेमाने वाढायला लवकरच रसिकांच्या भेटीला ‘गुलाबजाम', असे कॅप्शन देऊन सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे.‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणा-या भारतीय माणसाची गोष्ट आहे.मराठी पारंपारिक खाद्यपदार्थ शिकण्यासाठी आदित्य म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर भारतात येतो आणि पुण्यात आदित्यची भेट राधा अर्थात सोनाली कुलकर्णीशी होते. राधा त्याला तिची कला आणि भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थची टेकनिक शिकवण्याचा निर्णय घेते. यानंतर राधा आणि आदित्यच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते.मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे गुलाबजाम हा सिनेमा आहे असं कुंडलकर यांनी लिहिलंय. 

गुलाबजाम या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर खुद्द सिद्धार्थ चांदेकरनेच या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून आपल्या आगामी सिनेमाची माहिती चाहत्यांसह शेअर केली होती.सिद्धार्थने लंडनमध्ये शूटिंग करतेवेळी एक फोटोही शेअर केला होता.या फोटोत त्याने कोट घातलेला आहे आणि त्याने एक मफलर त्याच्या गळ्यात गुंडाळलेला आहेत. तसेच काळ्या रंगाचा चष्मा देखील घातलेला आहे. हा लूक त्याच्या गुलामबजाम या चित्रपटातील असल्याचे त्यानेच फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. 

Web Title: This is the second poster of Gulab Zam's film