"ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 13:58 IST2024-05-05T13:58:13+5:302024-05-05T13:58:37+5:30

'नाच गं घुमा' सध्या प्रचंड गाजतोय. यानिमित्त सिनेमातील अभिनेता सारंग साठ्येने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित भावूक गोष्ट शेअर केलीय

sarang sathaye emotional post after naach ga ghuma success | "ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट

"ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट

'नाच गं घुमा' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. सिनेमाची गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. सिनेमाचं कथानक सुद्धा प्रेक्षकांना आवडत आहे. 'नाच गं घुमा' मधील नम्रता संभेराव - मुक्ता बर्वे यांच्या जोडीलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. 'नाच गं घुमा' मध्ये अभिनेता सारंग साठ्येने मुक्ता बर्वेच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. सारंग साठ्येने सिनेमाला मिळणारं प्रेम बघून एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

सारंगने सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर करत लिहिलंय की, प्रिय बाबा ! आज आम्हाला मिळणारं प्रेम बघायला तुम्ही नाहीत ह्याची खंत आहे, पण जे काही कमावलं आहे ते तुमच्या आणि आईच्या संगोपना मुळेच . संवेदनशील , कणखर , सहिष्णू , आणि प्रेमळ बाप माणूस काय असतो हे दाखवून दिल्या बद्दल कायम कृतज्ञ राहू ! तुमच्या इतका देखणा (चिकणा) आणि हुशार नाही बनता येणारं , पण निदान प्रेमळ बनता येईल असा प्रयत्न सुरु ठेवेन.


परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावसह या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'नाच गं घुमा' सिनेमाने तब्बल २ कोटींचा गल्ला जमवला आहे. नम्रता - मुक्ताच्या जोडीचं प्रेक्षक कौतुक करत आहेत.

 

Web Title: sarang sathaye emotional post after naach ga ghuma success