Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:02 AM2022-07-14T11:02:47+5:302022-07-14T11:07:36+5:30

Sairat: ‘सैराट चित्रपटातील सल्या (Salya) तुम्हाला आठवत असेलच. होय, अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) याने सल्याची भूमिका साकारली होती. हाच सल्या सध्या चर्चेत आहे.

Sairat fame actor Salya aka Arbaj Shaikh abused in pune by autorickshaw driver | Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं?

Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं?

googlenewsNext

दमदार कथानक आणि नवख्या  कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘सैराट’ (Sairat) आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटातील आर्ची -परश्या अन् या दोघांच्या प्रेमाला साथ देणारे त्याचे जिगरी यार सगळंच अफलातून. या चित्रपटातील सल्या (Salya) तुम्हाला आठवत असेलच. होय, अभिनेता अरबाज शेख याने सल्याची भूमिका साकारली होती. हाच सल्या सध्या चर्चेत आहे. होय, सल्याची भूमिका साकारणाऱ्या अरबाज शेखला (Arbaj Aslam Shaikh) पुण्यात रिक्षावाल्याची अरेरावी सहन करावी लागली.

फेसबुकवर पोस्ट लिहित त्याने त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल सांगितलं आहे. माझा आरोप सरसकट सर्व रिक्षावाल्यावर नाही, हे त्याने पोस्टच्या सुरूवातीलाच स्पष्ट केलं आहे.

वाचा, अरबाजची पोस्ट

पुण्यात रिक्षा वाल्यांकडून लूट

सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही. नाव- असिफ मुल्ला, रिक्षा नंबर. MH 12 NW 9628, Nanded city to Pune Station 198 रुपये होतात. मी कधीच Ola, Uber, Rapido असले ॲप use करत नाही पाऊस चालू होता. मित्राला म्हणालो पाऊस चालू आहे कुठे सोडायला येतो आणि परत पावसात ये ये आणि जा जा ...माझ्या मित्राने मला रिक्षा करून दिली Rapido ॲप वरून. पाऊस चालू होता.

नांदेड सिटी मधून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवले.मी त्याला सांगितलं दादा तू खूप फिरवतो, त्या वर त्याने काही उत्तर दिले नाही.60 रुपये एक्स्ट्रा मागायला सुरुवात केली .मी म्हणलो. का ? मी त्याला विचारलं असता त्याने मला शिवी दिली. पाऊस चालू आहे...तू हितेच उतर... जास्त बोलू नको... मी रोज रिक्षा चालवतो तू नही... 60 rup extra द्यावे लागेल नही तर हितेच उतर....

मी उतरू शकत नव्हतो आणि मला ट्रेन होती 6 ची.

गावी जायचं होत . मी त्याला ओळख सांगितली नाही माझ्या सारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर हे असे face करावे लागत असेल तर गावावरून/ फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील... त्यांची हे लोक किती लूट करत असतील.  हे कुठे तरी थांबल पाहिजे....अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील...,, अशी पोस्ट अरबाजने शेअर केली आहे. 
 

Web Title: Sairat fame actor Salya aka Arbaj Shaikh abused in pune by autorickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.