रवी जाधव यांचा लेक कॅनडामध्ये झाला पदवीधर, पोस्ट शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:04 PM2024-06-16T12:04:18+5:302024-06-16T12:05:13+5:30

रवी जाधव यांचा मुलगा अथर्व हा परदेशात शिक्षण घेत होता.

Ravi Jadhav Son Atharva Jadhav Graduated from university of canada Shared A Video Of His Son Graduation Ceremony | रवी जाधव यांचा लेक कॅनडामध्ये झाला पदवीधर, पोस्ट शेअर करत म्हणाले...

रवी जाधव यांचा लेक कॅनडामध्ये झाला पदवीधर, पोस्ट शेअर करत म्हणाले...

मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची मुलं परदेशात शिक्षण घेऊन आपले नाव कमावत आहे. नुकतेच दिग्दर्शक रवी जाधव यांच्या लेकाने कॅनडामधून शिक्षण पुर्ण केलं आहे. रवी जाधव यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

रवी जाधव यांचा मुलगा अथर्व हा परदेशात शिक्षण घेत होता. अर्थवने कॅनडातील OCAD युनिव्हर्सिटीमधून डिजीटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) पदवी पूर्ण केली आहे.  नुकताच त्याचा पदवी प्रधान सोहळा पार पडला. त्यानिमित्त रवी जाधव हे तिथे गेले होते. लेकाची अतुलनीय कामगिरी पाहून  त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रवी जाधव यांनी आपल्या लेकासाठी खास अभिमानास्पद पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत मुलाचं कौतुक केलं. 

 रवी जाधव यांनी एक व्हिडीओ शेअर केला. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, 'आज माझ्या मुलाने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा मला खूप जास्त अभिमान वाटतोय. महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात त्याला रंगमंचावर हातात पदवी घेऊन जाताना पाहणं, हा क्षण मी कायम माझ्या मनात जपून ठेवेन. त्याची मेहनत, चिकाटी, डेडिकेशन या सगळ्या गोष्टींचं हे फळ आहे. अभिनंदन अथर्व तू खूप मोठा टप्पा आज पार केला आहे.आज तुझं स्मितहास्य जेवढं खुललं होतं, तेवढंच तुझं भविष्य उज्ज्वल असेल. आयुष्यात अशाच अनेक गोष्टी मिळवत राहा. आमचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे'.

 रवी जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यांच्या या पोस्टवर अनेक जण अर्थवचे कौतुक करत आहेत. त्याला अनेकांनी पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. रवी जाधव हे एक लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. 'नटरंग', 'न्यूड', 'टाइमपास', 'बालगंधर्व', 'ताली', 'मैं अटल हूँ' यांसारखे अनेक हिंदी,मराठी सिनेमा, वेबसीरिजचं दिग्दर्शन करुन त्यांनी इंडस्ट्रीवर आपली छाप पाडली आहे. रवी जाधव सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असतात. बऱ्याचदा ते त्याच्या जीवनातील लहान मोठे किस्से, घटना वा प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 
 

Web Title: Ravi Jadhav Son Atharva Jadhav Graduated from university of canada Shared A Video Of His Son Graduation Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.