‘राजा शिवाजी’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड; अवघ्या ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:29 IST2026-05-07T11:27:35+5:302026-05-07T11:29:54+5:30

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ; सहाव्या दिवशी किती कमावले? रितेश देशमुखच्या सिनेमाने केला आणखी एक रेकॉर्ड

raja shivaji movie box office collection day 6  starrer riteish deshmukh and genelia deshmukh  | ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड; अवघ्या ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमवला इतक्या कोटींचा गल्ला

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड; अवघ्या ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Raja Shivaji Movie Box Office Collection Day 6: अभिनेता रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘राजा शिवाजी ’ हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. रितेशने अभिनयासोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखनही केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये अक्षरश:गर्दी करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावरही ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची चर्चा आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवसांचा कालावधी लोटला आहे.मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक मोठी 'ओपनिंग' मिळवून, 'राजा शिवाजी'ने एक नवा मापदंड तयार केला आहे. 

आता सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४.२५ कोटींचा व्यवसाय करत या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.  तर आतापर्यंत 'राजा शिवाजी' सिनेमाची एकूण कमाई ४८.६५ कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा  ५० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावरून‘राजा शिवाजी’ हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला आहे. 'सैराट', 'बाई पण भारी देवा' तसेच 'वेड' या चित्रपटांच्या यादीत राजा शिवाजी सिनेमानं आपलं स्थान पक्कं केलं आहे. 

रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांच्या भूमिका आहेत.

Web Title : 'राजा शिवाजी' की धूम: बॉक्स ऑफिस पर बड़ी वृद्धि, नया रिकॉर्ड!

Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस पर हिट! छह दिनों में ₹4.25 करोड़ कमाए, कुल ₹48.65 करोड़। अब यह चौथी सबसे ज्यादा कमाई करने वाली मराठी फिल्म है, जल्द ही ₹50 करोड़ पार करने वाली है।

Web Title : 'Raja Shivaji' Surges: Big Box Office Growth, New Record!

Web Summary : Ritesh Deshmukh's 'Raja Shivaji' is a box office hit! In six days, it earned ₹4.25 crore, totaling ₹48.65 crore. It's now the fourth highest-grossing Marathi film, poised to cross ₹50 crore soon.