लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रिया बेर्डेंनी केला मोठा खुलासा, म्हणाल्या - "त्यांचे करिअर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 06:02 PM2023-11-28T18:02:12+5:302023-11-28T18:02:50+5:30

Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न रुही यांच्यासोबत झाले होते. कालांतराने ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी १९९८ साली प्रिया बेर्डे यांच्यासोबत लग्न केले.

Priya Berde made a big revelation about Laxmikant Berde's first wife, said - "His career..." | लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रिया बेर्डेंनी केला मोठा खुलासा, म्हणाल्या - "त्यांचे करिअर..."

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रिया बेर्डेंनी केला मोठा खुलासा, म्हणाल्या - "त्यांचे करिअर..."

मराठी कलाविश्वातील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. १९८४ साली आलेला चित्रपट लेक चालली सासरला, १९८५ साली धूमधडाका चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या या यशात त्यांच्या पहिल्या पत्नीचा खूप मोठा आहे, असं त्यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात सांगितलं.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न रुही यांच्यासोबत झाले होते. कालांतराने ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी १९९८ साली प्रिया बेर्डे यांच्यासोबत लग्न केले होते. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या करिअरमध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचा खूप मोठा वाटा असल्याचे प्रिया बेर्डेंनी म्हटले. नुकतेच प्रिया बेर्डे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

या प्रोमोत प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगताना दिसत आहेत की, नाहीतरी मी असे म्हणते, लक्ष्मीकांत बेर्डेंचे करिअर सेट करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, त्यांना उभे करण्यासाठी रुही बेर्डेंचा खूप मोठा हात होता.

प्रिया बेर्डेंचा बऱ्याच गोष्टींचा खुलासा

अभिनयला इंडस्ट्रीत आलेला वाईट अनुभव, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबतचे नाते, एकट्याने केलेलं मुलांचं संगोपन अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा या मुलाखतीत प्रिया बेर्डेंनी केला आहे. 

Web Title: Priya Berde made a big revelation about Laxmikant Berde's first wife, said - "His career..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.