'स्वतःला हिंदू म्हणताना..'; प्रवीण तरडेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत, सोशल मीडियावर होतीये व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 12:57 PM2024-05-26T12:57:30+5:302024-05-26T12:58:04+5:30

Snehal tarde: स्नेहलच्या पोस्टवर सेलिब्रिटींनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

pravin-tarde-wife-snehal-completed-study-of-vedas-shares-post | 'स्वतःला हिंदू म्हणताना..'; प्रवीण तरडेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत, सोशल मीडियावर होतीये व्हायरल

'स्वतःला हिंदू म्हणताना..'; प्रवीण तरडेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत, सोशल मीडियावर होतीये व्हायरल

मराठी कलाविश्वातील परफेक्ट जोडी म्हणून प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे या जोडीकडे कायम पाहिलं जातं. प्रवीण तरडे (pravin tarde) एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आहेत. तर, स्नेहल (snehal tarde) सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी स्नेहल पतीच्या पावलावर पाऊल ठेवत दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. यामध्येच आता तिने आणखी एका क्षेत्रात यश मिळवलं आहे. 

स्नेहल सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकताच तिने ‘Study of Vedas’ हा अभ्याक्रम पूर्ण केला आहे. स्नेहलने या परिक्षेत ७८ टक्के गुण मिळवले आहेत.

"वेदांचा अभ्यास' - स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला सर्वश्रेष्ठ मानताना तो धर्म ज्या चार वेदांवर आधारीत आहे, त्या वेदांचा मी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही याची खंत मला अनेक दिवस सतावत होती. पुण्यातील भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम या संस्थेतर्फे Study of Vedas या अभ्यासक्रमात 78 टक्के मिळवून आज ती खंत मी दूर केली. भारतातील अनेक मान्यवर गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आता आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मला मिळाली आहे, आशीर्वाद असावा", अशी पोस्ट स्नेहलने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

दरम्यान, स्नेहलची ही पोस्ट पाहून सामान्यांसह सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्राजक्ता माळीने देखील स्नेहलसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Web Title: pravin-tarde-wife-snehal-completed-study-of-vedas-shares-post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.