​प्रसाद झाला सांताक्लॉज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 02:15 PM2016-12-25T14:15:10+5:302016-12-25T14:15:10+5:30

प्रसाद ओक नेहमीच त्याच्या चित्रपटांतील हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. आता तर प्रसाद सांताक्लॉज झाला आहे.  तुम्हाला वाटेल की प्रसाद ...

Pratap Gaya Santa Claus | ​प्रसाद झाला सांताक्लॉज

​प्रसाद झाला सांताक्लॉज

googlenewsNext
रसाद ओक नेहमीच त्याच्या चित्रपटांतील हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. आता तर प्रसाद सांताक्लॉज झाला आहे.  तुम्हाला वाटेल की प्रसाद कोणत्या चित्रपटात सांताची भूमिका बजावणार आहे का. तर तसे बिलकुलच काही नाहीये. प्रसाद सध्या ख्रिसमसचा पुरेपुर आनंद घेत आहे. आणि या निमित्तानेच तो सांता होऊन सगळ््यांना गिफ्ट्स वाटण्याच्या तयारीला लागला आहे. नुकताच प्रसादचा सांगाच्या वेशातील एक मस्त फोटाो सोशल साईट्सवर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये प्रसाद एकमद हॅपी मुडमध्ये पाहायला मिळतोय. सांता सारखे लाल कपडे, डोक्यावर टोपी आणि पांढरीशुभ्र दाढी प्रसादला चांगलीच शोभून दिसत आहे. अहो प्रसाद एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्याने चक्क सांतासारखे सर्वांसाठी सरप्राईज गिफ्ट्स देखील आणले आहेत. आता तो कोणाला काय गिफ्ट देणार हे तर गुलदस्त्यातच आहे. परंतू हा मराठमोळा सांता सध्या नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे एवढे मात्र खरे. प्रसाद आता त्याच्या काही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. सोशल साईट्सवर तो नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असतो. सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहायला प्रसादला आवडते. आणि म्हणुनच तो आपल्या आयुष्यात घडणाºया छोट्या मोठ्या घडामोडी, सतत सोशल साईट्वर अपडेट करत असतो. बरं फक्त बातम्याच नाही तर प्रसाद नेटिझन्सना त्याच्या खास शैलीतील विनोदांनी देखील हसवत असतो. बºयाचदा आपल्याला प्रसादच्या वॉलवर प.पू प्रसाद नावाने अनेक जोक्स देखील पाहायला मिळतात. आता तर प्रसाद थेट सांताक्लॉज बनुनच सर्वांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी सज्ज झाला आहे.

Web Title: Pratap Gaya Santa Claus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.