बॉलिवूड अभिनेत्यासोबत थिरकताना दिसली पूजा सावंत; सिनेमातील गाण्यात दाखवला जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 08:39 IST2024-02-05T08:36:18+5:302024-02-05T08:39:38+5:30

पुन्हा बॉलिवूड सिनेमात झळकणार पूजा सावंत, चित्रपटातील गाणं प्रदर्शित

pooja sawant shared screen with vidyut jamwal in crakk movie song rom rom released | बॉलिवूड अभिनेत्यासोबत थिरकताना दिसली पूजा सावंत; सिनेमातील गाण्यात दाखवला जलवा

बॉलिवूड अभिनेत्यासोबत थिरकताना दिसली पूजा सावंत; सिनेमातील गाण्यात दाखवला जलवा

मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. 'दगडी चाळ', 'क्षणभर विश्रांती', 'लपाछपी', 'भेटली तू पुन्हा' अशा सुपरहिट सिनेमांत काम करून पूजाने अभिनयाचा ठसा उमटवला. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही पूजा झळकली. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या जंगली या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा पूजा बॉलिवूडमध्ये तिचा जलवा दाखवणार आहे. 

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'क्रॅक' या आगामी सिनेमातील गाण्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत पूजा बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालसोबत थिरकताना दिसत आहे. 'क्रॅक' या सिनेमातील 'रॉम रॉम' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पूजा आणि विद्युतची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पूजाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, पूजा अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. पूजा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पूजाने साखरपुडा केल्याचं सांगितलं होतं. आता ती लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. 

Web Title: pooja sawant shared screen with vidyut jamwal in crakk movie song rom rom released