प्रभात बॅन्डचं ‘लूज कंट्रोल’ सिनेमासाठी वादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 15:07 IST2018-02-22T09:37:57+5:302018-02-22T15:07:57+5:30

सध्या सगळीकडे चर्चा असलेल्या ‘लूज कंट्रोल’ या सिनेमात पुण्यातील प्रसिद्ध आणि सर्वात जुन्या प्रभात बॅन्डने वाद्य वाजवली आहेत. ‘सोनू ...

Playing for Prabhat Band's 'Loose Control' cinema | प्रभात बॅन्डचं ‘लूज कंट्रोल’ सिनेमासाठी वादन

प्रभात बॅन्डचं ‘लूज कंट्रोल’ सिनेमासाठी वादन

्या सगळीकडे चर्चा असलेल्या ‘लूज कंट्रोल’ या सिनेमात पुण्यातील प्रसिद्ध आणि सर्वात जुन्या प्रभात बॅन्डने वाद्य वाजवली आहेत. ‘सोनू तूझा डाव’ या गाण्यासाठी संगीतकार रोहित नागभिडे यांनी त्यांच्याकडून वाद्य वाजवून घेतली. प्रसिद्धा गायक आदर्श शिंदे याच्या आवाजात हे गाणं असून या गाण्याने सध्या सगळीकडे धुमाकूळ केलाय. आदर्श शिंदेचं या माध्यमातून पुन्हा एक गाणं सुपरहिट ठरलं आहे. एरवी लग्न समारंभात वादन करना-या प्रभात बॅन्डच्या सदस्यांनी पहिल्यांदाच सिनेमासाठी वादन केलंय. प्रभात बॅन्डच्या वादनामुळे या गाण्यात वेगळीच रंगत आली आहे. या माध्यमातून संगीतकाराने या बॅन्डच्या सदस्यांचा सन्मानच केलाय. या गाण्यात अभिनेते भाऊ कदम कुशल बद्रीके, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमघर यांनी धमाल उडवून दिली आहे. प्रभात बॅन्डच्या वादनाने या गाण्याला वेगळाच साज चढला आहे. तर या गाण्याचे अफलातून कोरिओग्राफी  संतोष पालवणकर याने केलीये. 

या धमाल सिनेमात भाऊ कदम, कुशल बद्रीके, मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांत केरकर, शशांक शेंडे, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय  बंटावा , बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 

अजय सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा आणि पटकथा त्यांनीच लिहिली आहे. तर खळखळून हसायला लावणारे संवाद प्रियदर्शन जाधव यानी लिहिले आहेत. रोहित नागभीडे आणि मिहीर भट यांनी धमाल संगीत दिलंय. पार्श्वसंगीत आशिष यांनी दिलंय. सिनेमाचं संकलन उज्वल चंद्रा यांनी केलंय. सिनेमटोग्राफी मर्जी पगडीवाला यांनी केलीये. तसेच या सिनेमातील धमाकेदार गाण्यांची कोरिओग्राफी  संतोष पालवणकर यांनी केली. हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 

Web Title: Playing for Prabhat Band's 'Loose Control' cinema