'पुष्पक विमान' सिनेमात हा कलाकार साकारणार संत तुकाराम,सुबोधने शेअर केलेल्या फोटोमुळे उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 14:19 IST2018-04-07T08:49:34+5:302018-04-07T14:19:34+5:30

अभिनेता सुबोध भावेचा 'पुष्पक विमान' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनी सुबोध भावेने ...

The photo shared by Sant Tukaram, Subodh | 'पुष्पक विमान' सिनेमात हा कलाकार साकारणार संत तुकाराम,सुबोधने शेअर केलेल्या फोटोमुळे उत्सुकता शिगेला

'पुष्पक विमान' सिनेमात हा कलाकार साकारणार संत तुकाराम,सुबोधने शेअर केलेल्या फोटोमुळे उत्सुकता शिगेला

िनेता सुबोध भावेचा 'पुष्पक विमान' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनी सुबोध भावेने 'पुष्पक विमान' या सिनेमाची घोषणा केली.'कट्यार काळजात घुसली' या सिनेमानंतर सुबोध दिग्दर्शित करत असलेला हा दुसरा सिनेमा आहे.'संत तुकाराम' यांच्यावर या सिनेमाची कथा बेतलेली आहे.आजवर संत तुकारामांवर दोन सिनेमा येऊन गेले आहेत.पहिल्या सिनेमात विष्णुपंत पागनीस यांनी तुकारामाची भूमिका केली होती.दुस-या सिनेमात अभिनेता जितेंद्र जोशीने संत तुकारामांची भूमिका साकारली होती.त्यामुळे आता सुबोधच्या 'पुष्पक विमान' या सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.नुकतंच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो सुबोधने शेअर केला आहे.या फोटोसह कोण लपलंय बरं असा प्रश्नही उपस्थित केला आहे.या फोटोतील व्यक्ती म्हणजे संत तुकारामांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता असल्याच्या चर्चा आहेत.मात्र हा अभिनेता कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही सुबोधकडे याबाबत ट्विटरवर विचारणा केली आहे.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमे-याआड लपलेला हा अभिनेता म्हणजे राहुल देशपांडे असेल असं बोललं जात आहे.राहुल देशपांडे संत तुकाराम ही भूमिका पार पडणार असून मोहन जोशी आजोबा आणि सुबोध भावे त्यांच्या नातवाची भूमिका करणार आहेत. नेमकी या सिनेमाची कथा काय असणार हे याबाबत उत्सुकता आहे.

Also Read:सुबोध भावे आणि श्रुती मराठे आता झळकणार या चित्रपटात

'बंध नायलॉनचे' मधून लोकांच्या पसंतीस पडलेली सुपरहिट जोडी सुबोध भावे आणि श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहे. सुबोध आणि श्रुती तब्बल दोन वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत.तूर्तास या सिनेमाचे नाव ठरले नसले तरी फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन्स निर्मित या सिनेमाचे समीर रमेश सुर्वे दिग्दर्शन कऱणार आहेत.सुबोध - श्रुती या जोडीचा चाहतावर्गदेखील मोठा असल्यामुळे त्यांच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.सुबोधसोबत श्रुती काम करणार असल्याचे श्रुतीने काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगितले होते.श्रुतीने तिचा आणि सुबोधचा एक छानसा फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला होता. या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिले होते की,माझा नवीन चित्रपट, नवीन दिवस पण जुना मित्र. या कॅप्शनवरून ते दोघे चित्रपटात एकत्र काम करत असल्याचे तिने सांगितले होते. 

Web Title: The photo shared by Sant Tukaram, Subodh